भोपाळ येथे ‘व्हॅलेंटाईन डे’ला तोडफोड केल्याच्या प्रकरणी भाजपच्या माजी आमदारासह १७ जणांना अटक

भोपाळ (मध्यप्रदेश) – येथे ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी तोडफोड केल्याच्या प्रकरणी भाजपचे आमदार सुरेंद्रनाथ सिंह यांच्यासह १७ जणांना अटक करण्यात आली आहे. ‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली लव्ह जिहादला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप करत त्यांनी येथील रेस्टॉरंट आणि हुक्का बार यांची तोडफोड केली होती. तोडफोड करणारे आरोपी भारतीय जनता युवा मोर्चा आणि शिवसेना यांचे कार्यकर्ते आहेत.


( साैजन्य : NDTV )