आरोपी मुसलमानाला अटक
पिलीभीत (उत्तरप्रदेश) – नेपाळमधील एका हिंदु मुलीवर बलात्कार करून तिचे धर्मांतर केल्याचा आरोप असलेल्या अमजद याला पोलिसांनी उत्तरप्रदेशातील पिलीभीत जिल्ह्यात अटक केली आहे. ९ सप्टेंबर २०२४ या दिवशी अमजदच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. अमजद समवेत त्याची आई कैसर जहाँ, भाऊ भाऊ चंगेज आणि रंगीला यांच्यावरही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अन्य पसार आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.
१. वर्ष २०१३ मध्ये म्हणजे ११ वर्षांपूर्वी पीडित तरुणी नेपाळमधील धनघडी येथे काम करत होती. पिलीभीत येथील टॅक्सीचालक असलेला अमजद अनेकदा तिथे जायचा. स्वत:ची ओळख अजय अशी करून त्याने तिच्याशी मैत्री केली आणि त्याने तरुणीला देहलीत नोकरी लावण्याचे आमीष दाखवून भारतात बोलावले.
२. पिलीभीत येथील कलीमनगर येथे त्याचा मेव्हणा वाहिद खान यांच्या घरी तरुणीला ठेवले. याठिकाणी पीडितेवर बंदुकीच्या धाकावर बलात्कार करण्यासह तिच्यावर धर्मांतर करून विवाह करण्यासाठी दबाव आणला. यामध्ये अमजदच्या कुटुंबियांनीही त्याला साथ दिली. या काळात पीडितेला पिलीभीतमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आले होते.
३. पीडित तरुणीने धर्मांतर करण्यास नकार दिल्यावर ‘एकतर मुसलमान हो, अन्यथा आम्ही तुला मारून टाकू’, अशी धमकी मुसलमानांनी दिली. जीव वाचवण्यासाठी तरुणीने इस्लाम धर्म स्वीकारला. हे धर्मांतर बरेलीमध्ये झाले. धर्मांतरानंतर पीडितेचे नाव पालटून मेहरूनिसा ठेवण्यात आले. तसेच गोमांस खाण्यासाठी दबाव टाकण्यात आला.
४. धर्मांतरानंतर अमजदने पीडितेचा विवाह फिरोज नावाच्या त्याच्या भावासमवेत करून दिला. फिरोज घटस्फोटित होता आणि त्याला ४ मुले होती. पीडितेने विरोध केला असता फिरोज आणि रंगीला यांनी तिला बेदम मारहाण केली. त्याचा दुसरा भाऊ चंगेज यानेही पीडितेवर अनेकदा बलात्कार केला आहे. पीडितीने या प्रकरणी पोलिसांत तक्रार केल्यानंतर गुन्हा नोंदवण्यात आला.
संपादकीय भूमिकाउत्तरप्रदेशात लव्ह जिहादविरोधी कायदा असूनही धर्मांध मुसलमानांवर त्याचा कोणताही परिणाम झाल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे या कायद्यातील शिक्षेचे प्रावधान वाढवून ते फाशीमध्ये परावर्तित करणे आता आवश्यक झाले आहे, असेच या घटनांवरून लक्षात येते ! |