Bangladesh : बांगलादेशात महिलांना अधिकार देण्याच्या सूत्रावरून इस्लामी कट्टरतावादी संतप्त !

इस्लामी कट्टरतावाद

ढाका – बांगलादेशात महिलांना अधिकार देण्याच्या सूत्रावरून इस्लामी कट्टरतावादी संतापले आहेत. महिलांना मालमत्तेत वाटा देण्यास त्यांनी विरोध दर्शवला आहे. हे सर्व इस्लामविरुद्ध असल्याचे त्यांनी म्हटले आहे. बांगलादेशामध्ये महिलांच्या हक्कांसाठी काम करणार्‍या आयोगाने अलीकडेच अंतरिम सरकारचे प्रमुख महंमद युनूस यांना एक अहवाल सुपुर्द केला आहे. या अहवालात महिलांच्या कल्याणासाठी ४३३ शिफारसी केल्या आहेत.

बांगलादेशातील ‘जमात-ए-इस्लामी’, ‘इस्लामी मुव्हमेंट बांगलादेश’ आणि ‘हेफाजत-ए-इस्लाम’ यांसारख्या इस्लामी संघटनांनी ते ‘अस्वीकारार्ह’ घोषित केले आहे. त्यांनी युनूस सरकारकडे या शिफारसी रहित करण्याची मागणी केली आहे.

युनूस सरकारकडे या शिफारसी रहित करण्याची मागणी

१. महिला आयोगाचा अहवालात बांगलादेशातील महिला आणि पुरुष यांना समान मालमत्ता हक्क मिळावेत, याविषयी म्हटले आहे. यावर ‘जमात-ए-इस्लामी’चे सरचिटणीस मिया परवार म्हणाले की, हा प्रस्ताव इस्लामी कायद्यांच्या विरोधात आहे आणि तो लागू करणे म्हणजे ‘शरीयतच्या विरोधात उभे रहाणे’ ठरेल.

२. ‘इस्लामी मुव्हमेंट बांगलादेश’च्या महिला शाखेने हा अहवाल सांस्कृतिक आणि धार्मिक विषयांशी संबंधित नसल्याचे म्हटले आहे. ‘हेफाजत-ए-इस्लाम’ने महिला आयोगच रहित करण्याची मागणी केली आहे.

संपादकीय भूमिका

इस्लाममध्ये महिलांना उपभोगाची वस्तू समजले जाते. त्यामुळे त्यांच्या अधिकाराविषयी कुणी बोलल्यावर कट्टरतावाद्यांकडून कशा प्रतिक्रिया उमटल्यास आश्चर्य असे काहीच नाही ! मुसलमानांच्या कथित प्रेमात आंधळे होऊन धर्मांतर करण्यास निघालेल्या हिंदु युवतींनी हे लक्षात घेणे आवश्यक !