धारवाड (कर्नाटक) – येथील जुनी तहसील कचेरी येथे ४ मुसलमान तरुणांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते शिरीष बळ्ळारी यांच्या घरात घुसून त्यांच्यावर आक्रमण केले. या आक्रमणात शिरीष बळ्ळारी घायाळ झाले आहेत.
याविषयीच्या माहितीनुसार, काही मुसलमान तरुण शिरीष बळ्ळारी यांच्या घराजवळ सिगारेट पीत उभे होते. त्या वेळी बळ्ळारी यांनी त्यांना दूर जाऊन सिगारेट पिण्यास सांगितले. यामुळे संतप्त झालेल्या ४ मुसलमान तरुणांनी बळ्ळारी यांच्या घरात घुसून त्यांना मारहाण केली. (क्षुल्लक कारणावरून आक्रमण करणारे गुंड वृत्तीने मुसलमान ! – संपादक) या आक्रमणात शिरीष बळ्ळारी गंभीररित्या घायाळ झाले असून त्यांना जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. ही घटना धारवाड शहर पोलीस ठाण्याच्या सीमेत घडली आहे. हिंदु संघटनांच्या नेत्यांनी आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे.
संपादकीय भूमिकाधर्मांधांचा उद्दामपणा जाणा ! |