Assam Pro-Pakistan MLA : आसाममधील आमदार अमिनूल इस्लाम याला देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक

पहलगाम येथील आक्रमणानंतर पाकिस्तानची घेतली बाजू  

आमदार अमिनूल इस्लाम

गोहत्ती (आसाम) –आसाममधील ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंट (ए.आय.यू.डी.एफ्.) या पक्षाचा आमदार अमिनूल इस्लाम याला पाकिस्तानची बाजू घेतल्यावरून देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली त्याला अटक करण्यात आली आहे. इस्लाम याला नागाव जिल्ह्यातील त्याच्या निवासस्थानातून अटक करण्यात आली. तो धिंग मतदारसंघातून ३ वेळा आमदार म्हणून निवडून आला आहे. पहलगाम येथे झालेल्या आतंकवादी आक्रमणानंतर त्याने एक व्हिडीओ प्रसारित करत पाकिस्तानचे समर्थन केले होते.

आमदाराच्या विधानावर ए.आय.यू.डी.एफ्.नेही म्हटले आहे की, इस्लाम याचे ते वैयक्तिक विचार असून पक्षाचे नाहीत. अध्यक्ष बद्रुद्दीन अजमल यांनी म्हटले की, अनिमूल इस्लाम यांचे विधान दुर्दैवी आहे. आताची वेळ सरकारसमवेत उभे रहाण्याची आहे. आतंकवाद्यांना कोणताही धर्म नसतो. आतंकवादी इस्लामला अपकीर्त करत आहेत.

संपादकीय भूमिका

अशांवर तात्काळ जलद गती न्यायालयात खटला चालवून फाशीची शिक्षा सुनावून त्याची तितक्याच तत्परतेने कार्यवाही करणे आवश्यक आहे. असे केले, तरच देशातील देशद्रोह्यांना वचक बसेल !