कार्यकारी अभियंत्यांसह ३ जणांना लाच घेतांना अटक

लाचखोरांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांना कठोर शिक्षा केल्याविना इतरांवर जरब बसणार नाही !

वणी (जिल्हा यवतमाळ) येथे बजरंग दल गोरक्षकांकडून ७० गोवंशियांची मुक्तता !

गोवंशहत्या बंदी कायद्याची कठोर कार्यवाही होत नसल्याचाच हा परिणाम !

धर्माचरण हाच ‘लव्ह जिहाद’वर उपाय ! – कु. क्रांती पेटकर, रणरागिणी शाखा, पुणे

राजमाता जिजाऊ, महाराणी येसूबाई, झाशीची राणी लक्ष्मीबाई, महाराणी पद्मावती, अहिल्याबाई होळकर अशा अनेक महिलांचा शौर्यशाली इतिहास आपल्याला लाभला आहे.

महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीचे उदात्तीकरण होऊ देणार नाही ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

काहीही झाले, तरी महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीचे महिमामंडन (प्रशंसा) आणि उदात्तीकरण होऊ देणार नाही. तसे करण्याचा कुणी प्रयत्न केल्यास तो प्रयत्न त्याच ठिकाणी चिघळून टाकण्याचे काम करू, हे वचन देतो, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १७ मार्च या दिवशी दिली.

Kolhapur Fight For Chhatrapati Shivaji Maharaj University : ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ असा नामविस्तार झालाच पाहिजे !

छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार जयंतीच्या दिवशी आयोजित या मोर्चाद्वारे १० सहस्रांहून अधिक हिंदूंनी एकमुखाने ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ असा नामविस्तार झालाच पाहिजे’, अशी जोरदार मागणी केली.

‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ नामविस्ताराचा निर्णय तातडीने घ्यावा ! – आमदार राजेश क्षीरसागर, शिवसेना

कोल्हापूर येथील ‘शिवाजी विद्यापीठ’ नावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख करण्यात आला आहे. शिवाजी विद्यापिठाचा नामविस्तार ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’, असा करण्यासाठी १७ मार्च या दिवशी कोल्हापूर येथे सहस्रावधींच्या संख्येने मोर्चा काढण्यात येत आहे.

Amritsar Temple Grenade Attack : अमृतसर (पंजाब) : मंदिरावर बाँबद्वारे आक्रमण करणारा एक आरोपी चकमकीत ठार

अमृतसर येथील ठाकुरद्वारा मंदिराबाहेर ३ दिवसांपूर्वी हातबाँबद्वारे स्फोट घडवण्यात आला होता. दुचाकीवरून आलेल्यांनी हा स्फोट घडवला होता.

T. Raja Singh On Aurangjeb Tomb : औरंगजेबाची कबर अजूनही अस्तित्वात का आहे ?

औरंगजेबाची महाराष्ट्रातील कबर एखाद्या विषारी तलवारीसारखी आहे. ही कबर राज्यातून हटवण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्रातील हिंदू करत आहेत. आता अवघ्या देशातील हिंदू विचारत आहेत की, औरंगजेबाची कबर अजूनही इथे का आहे ?

Bangladesh University Suspends 2 Student : बांगलादेशात इस्लामचा अपमान केल्याच्या आरोपावरून २ विद्यार्थी निलंबित

ढाका येथील पबना विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापिठाने इस्लामचा अपमान केल्याच्या आरोपावरून बिकर्ण दास दिव्या अन् प्रणय कुंडू या हिंदु विद्यार्थ्यांना निलंबित केले.

Mufti Abdul Baki Noorzi : पाकमध्ये इस्लामी संघटनेच्या नेत्याची हत्या

क्वेटा येथे अज्ञातांनी जमियत उलेमा-ए-इस्लाम (जेयूआय) या संघटनेचे वरिष्ठ नेते मुफ्ती अब्दुल बाकी नूरझाई यांची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना एअरपोर्ट रस्त्यावर घडली.