Mufti Abdul Baki Noorzi : पाकमध्ये इस्लामी संघटनेच्या नेत्याची हत्या

क्वेटा (बलुचिस्तान) – येथे अज्ञातांनी जमियत उलेमा-ए-इस्लाम (जेयूआय) या संघटनेचे वरिष्ठ नेते मुफ्ती अब्दुल बाकी नूरझाई यांची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना एअरपोर्ट रस्त्यावर घडली. या घटनेमुळे पाकिस्तानात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

गेल्या आठवड्यात बलुचिस्तानमधील तुर्बत येथे अज्ञातांनी जिहादी आतंकवादी मुफ्ती शाह मीर याची गोळ्या झाडून हत्या केली होती.