अमृतसर (पंजाब) – येथील ठाकुरद्वारा मंदिराबाहेर ३ दिवसांपूर्वी हातबाँबद्वारे स्फोट घडवण्यात आला होता. दुचाकीवरून आलेल्यांनी हा स्फोट घडवला होता.
पोलिसांनी या २ आरोपींपैकी एकाला विमानतळ मार्गावर झालेल्या चकमकीत ठार मारले, तर दुसरा पळून गेला. या चकमकीत एक पोलीस शिपाई गोळी लागल्याने घायाळ झाला. गुरसिदक उपाख्य सिदकी उपाख्य जगजीत सिंह ठार झाला, तर चुई उपाख्य राजू पसार झाला. हे दोघेही ‘बब्बर खालसा इंटरनॅशनल’ या खलिस्तानी आतंकवादी संघटनेशी संबंधित आहेत.