T. Raja Singh On Aurangjeb Tomb : औरंगजेबाची कबर अजूनही अस्तित्वात का आहे ?

भाजपचे प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह यांचा प्रश्‍न

आमदार टी. राजासिंह

पुणे – औरंगजेबाची महाराष्ट्रातील कबर एखाद्या विषारी तलवारीसारखी आहे. ही कबर राज्यातून हटवण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्रातील हिंदू करत आहेत. आता अवघ्या देशातील हिंदू विचारत आहेत की, औरंगजेबाची कबर अजूनही इथे का आहे ? माझा आता एकच संकल्प आहे, भारताला हिंदु राष्ट्र बनवणे आणि औरंगजेबाची कबर इथून हटवणे, असे विधान भाग्यनगर (तेलंगाणा) येथील भाजपचे प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह यांनी केले.

 

कबरीवर कारसेवा होणार असेल, तर माझे समर्थन !

विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या कार्यकर्त्यांनी ‘जर सरकार औरंगजेबाची कबर हटवू शकत नसेल, तर आम्ही तिथे कारसेवा (श्रीरामजन्मभूमीवरील बाबरी ढाचा हटवण्यासाठी हिंदूंनी केलेले आंदोलन) बजावू’, असे म्हटले आहे. त्याला माझे समर्थन आहे, असेही टी. राजासिंह यांनी सांगितले.

(म्हणे) ‘औरंगजेबाची कबर हटवून काय साधणार ?’ – काँग्रेस

औरंगजेबाची कबर ठेवून काँग्रेसवाले काय साधणार आहेत ? हे त्यांनी आधी सांगावे ! काँग्रेसने सत्तेत औरंगाबाद शहराचे नाव पालटून संभाजीनगर का केले नाही किंवा त्यांच्या समाधीसाठी काय केले ? हे पहाता काँग्रेसला औरंगजेबाचा पुळका आधीपासूनच आहे, हेच पुन्हा ते सांगत आहेत !

विहिंप आणि बजरंग दल यांच्याकडे काहीही काम उरलेले नाही. महाराष्ट्रातील जनतेने शांततेत रहावे, असे त्यांना वाटतच नाही. त्यांना राज्याच्या विकासाची गती अल्प करायची आहे. (औरंगजेबाची कबर आणि विकासाची गती यांचा काय संबंध ? – संपादक) मला त्यांना सांगायचे आहे की, औरंगजेब इथे २७ वर्षे होता; पण त्याला इथे काहीही करता आले नाही; मग आता त्याची कबर इथून हटवून काय साधणार आहे ? असा प्रश्‍न काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.