आणखी ५ विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात येणार
ढाका (बांगलादेश) – येथील पबना विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापिठाने इस्लामचा अपमान केल्याच्या आरोपावरून बिकर्ण दास दिव्या अन् प्रणय कुंडू या हिंदु विद्यार्थ्यांना निलंबित केले. याखेरीज अन्य ५ विद्यार्थ्यांनाही या प्रकरणी निलंबित करण्याची मागणी केली जात आहे. याविषयीही लवकरच निर्णय घेतला जाणार आहे.
फार्मसी विभागातील विद्युत् सरकार, सुवर्णा सरकार, दीपू बिस्वास, तनय सरकार आणि अंकन घोष यांच्यावर व्हॉट्स अॅपवर इस्लामविषयी अपमानास्पद टिप्पणी करत असल्याचा आरोप आहे. ही घटना उघडकीस येताच विद्यापिठातील काही विद्यार्थ्यांनी निषेध करण्यास चालू केला आणि त्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली.