छत्तीसगड येथील राजीम कुंभमेळ्यामध्ये सनातन संस्थेच्या वतीने लावण्यात आलेल्या ग्रंथप्रदर्शनाचे पू. बालकदासजी महाराज यांच्या हस्ते उद्घाटन

राजीम (छत्तीसगड) – प्रतिवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी येथे राजीम कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. माघ पौर्णिमा ते महाशिवरात्र या काळात भरणार्‍या या कुंभमेळ्याच्या ठिकाणी सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ, सात्त्विक उत्पादने आणि धर्मशिक्षण फलक यांचे प्रदर्शन लावण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन २१ फेब्रुवारी या दिवशी पू. बालकदासजी महाराज यांच्या हस्ते भावपूर्ण वातावरणात दीपप्रज्वलनाने करण्यात आले. याप्रसंगी रायपूर येथील ‘गीता प्रेस’चे श्री. रामदेव यादव, सनातन संस्थेचे श्री. हेमंत कानस्कर, तसेच पू. बालकदासजी महाराज यांचे शिष्यगण उपस्थित होते.

या वेळी २५ फेब्रुवारी या दिवशी राजीम क्षेत्रात होणार्‍या संतसंमेलनाचे निमंत्रणही पू. बालकदासजी महाराज यांनी सनातनच्या साधकांना आवर्जून दिले. पू. बालकदासजी महाराज यांनी दिलेल्या निमंत्रणावरून सनातन संस्थेने सर्वप्रथम या कुंभमेळ्यात ग्रंथप्रदर्शन लावले होते. तेव्हापासून प्रतिवर्षी येथे हे प्रदर्शन लावण्यात येत आहे. आज याला १० वर्षे पूर्ण झाली आहेत.