बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचा पोलीस ठाण्याला घेराव !

नागपूर – येथील बीडीपेठ रोडवरील ताजबागच्या मागे आशीर्वाद चौकात गायीच्या मांसाने भरलेली १० पोती टाकण्यात आली होती. वृत्त समजल्यावर बजरंग दलाचे कार्यकर्ते घटनास्थळी जमले. नागपूर महानगरपालिका प्रशासन कचरा टाकला जात असल्याच्या ठिकाणी गायीचे अवशेष नेत होते; गोरक्षकांनी त्यांना अडवले आणि हे अवशेष सक्करदरा पोलीस ठाण्यात नेण्याची मागणी केली. पोलिसांनी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या मागण्या मान्य करत डंपर गाडीच पोलीस ठाणे परिसरात आणली आणि त्यानंतर सर्व गोण्या कचरा टाकण्याच्या ठिकाणी पाठवण्यात आल्या. या प्रकरणी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याला घेराव घातला आणि घडलेल्या प्रकरणाची न्याय्य मागणी केली. (अशी मागणी का करावी लागते ? पोलीस स्वतःहून कारवाई का करत नाही ? – संपादक)
या प्रकरणी विश्व हिंदु परिषदेचे नागपूर महानगर मंत्री अमोल ठाकरे म्हणाले, ‘‘नागपूर येथे गायींच्या संदर्भात अवमानकारक कृत्ये वाढत आहेत. हे कृत्य कसायांचे किंवा जिहाद्यांचेच आहे. आतापर्यंत अशा अनेक घटना घडल्या आहेत; मात्र अजून कुणावरच कारवाई झालेली नाही, हे दुर्दैवी आहे.’’
संपादकीय भूमिका :
|