धर्मांधांकडून रस्त्यावर मुरूम टाकून शेतकरी आणि ट्रकचालक यांना जाण्यास प्रतिबंध !

सांगली, २३ फेब्रुवारी (वार्ता.) – शहरातील वखार भागातील ईदगाह मैदानाजवळ असलेला सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या मालकीचा रस्ता मरकसच्या ‘मुस्लिम ट्रस्टी’ने मुरूमाचे ढीग टाकून अडवला होता. त्यामुळे या रस्त्यावरून जाता येत नसल्याने ट्रकचालक आणि शेतकरी यांनी हिंदु एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष अन् माजी आमदार श्री. नितीन शिंदे यांच्याकडे याविषयी तक्रार केली. श्री. शिंदे यांनी महापालिकेच्या आयुक्तांना निवेदन दिले. त्यानंतर २२ फेब्रुवारी या दिवशी महापालिकेने जेसीबीच्या साहाय्याने मुरूम काढून रस्ता मोकळा करून दिला. (जाणीवपूर्वक मुरूम टाकून रस्ता अडवणार्या धर्मांधांना पोलिसांचा धाक नाही, हे लक्षात येते. हिंदूंनी संघटितपणे विरोध केल्यास त्याला यश मिळते, हे यातून लक्षात येते ! – संपादक)
१. ईदगाह मैदानाच्या पाठीमागे असलेल्या शेतभूमीकडे जाण्यासाठी शेतकर्यांना आणि ट्रक वाहनतळाकडे जाण्यासाठी ट्रकचालक यांच्यासाठी हा रस्ता महत्त्वाचा होता.
२. मात्र धर्मांधांनी जाणीवपूर्वक रस्त्यावर मुरूम टाकून तेथून जाण्यास एकप्रकारे विरोध केला होता.
३. या विरोधात वखार भागातील शेतकर्यांनी हिंदु एकता आंदोलनाकडे वैरण आणण्यासाठी हा रस्ता मोकळा करून मिळावा, अशी मागणी केली.
४. त्यानंतर हिंदु एकता आंदोलन संघटनेच्या शिष्टमंडळाने महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांना निवेदन दिले.
५. महापालिकेच्या अधिकार्यांनी हिंदु एकता आंदोलनाच्या पदाधिकार्यांच्या समक्ष मुरूमाचे ढीग ‘जेसीबी’ने काढून रस्ता स्वच्छ केला.
६. रस्ता मोकळा झाल्यानंतर शेतकर्यांनी हिंदु एकता आंदोलन संघटनेचे आभार मानले.
या प्रसंगी हिंदु एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष श्री. नितीन शिंदे, सांगली शहर जिल्हाध्यक्ष श्री. संजय जाधव, सांगली शहर जिल्हा उपाध्यक्ष श्री. राजू जाधव, सांगली शहराध्यक्ष श्री. प्रकाश चव्हाण, मिरज शहराध्यक्ष श्री. सोमनाथ गोटखिंडे आदी उपस्थित होते.
संपादकीय भूमिका :धर्मांधांनी रस्त्यावर टाकलेला मुरूम काढायचे प्रशासनाच्या लक्षात येत नाही कि प्रशासन याकडे दुर्लक्ष करते ? हे शोधले पाहिजे ! |