महामंडलेश्वर गीता मनीषी स्वामी श्री ज्ञानानंद महाराज यांची सनातन संस्थेच्या प्रदर्शन कक्षाला भेट !

हामंडलेश्वर गीता मनीषी स्वामी श्री ज्ञानानंद महाराज

प्रयागराज – ‘श्रीकृष्ण कृपा धाम’चे महामंडलेश्वर गीता मनीषी स्वामी श्री ज्ञानानंद महाराज यांनी कुंभक्षेत्री असलेल्या सनातन संस्थेच्या सेक्टर ९ येथील प्रदर्शन कक्षाला सदिच्छा भेट दिली. महामंडलेश्वर गीता मनीषी स्वामी श्री ज्ञानानंद महाराज यांनी सर्व प्रदर्शन पाहिले. या प्रसंगी सनातनच्या कार्याला आशीर्वाद देऊन ते म्हणाले, ‘‘सनातन केवळ श्रद्धाच नाही, तर अस्मिता, स्वाभिमान, परंपरा आहे. सनातन संस्थेचे धर्मशिक्षण फलक केवळ लहान मुलांनाच नव्हे, तर त्यांच्या पालकांनाही धर्मशास्त्रीय परिभाषा माहिती व्हावी, अशी माहिती देतात. सनातन धर्मानुसार आदर्श आचरण कसे असावे, हे आपल्याला त्यातून शिकायला मिळेल. या कार्यासाठी, तसेच या उद्देशाच्या पूर्तीसाठी माझ्या त्यांना शुभेच्छा !’’