(म्हणे) ‘गंगेच्या पाण्यातील पापे अंगाला चिकटतील; म्हणून मी पाण्यात डुबकी मारली नाही !’

ठाकरे गटाचे आमदार सुनील राऊत यांचे हिंदुद्वेषी विधान !

आमदार सुनील राऊत

मुंबई – हिंदु धर्मात आणि परंपरेत अतिशय पवित्र मानल्या जाणार्‍या प्रयागराज महाकुंभपर्वात कुणीही जाऊ नका. प्रयागराजमधील गंगा नदीतील पाण्यातील पापे माझ्या अंगाला चिकटतील; म्हणून मी पाण्यात डुबकी मारलीच नाही, असे हिंदुद्वेषी विधान खासदार संजय राऊत यांचे मोठे बंधू आणि ठाकरे गटाचे आमदार सुनील राऊत यांनी केले.

शिवसेनेकडून कारवाईची मागणी !

या प्रकरणी शिवसेनेच्या प्रवक्त्या आणि आमदार मनीषा कायंदे म्हणाल्या, ‘‘ठाकरे गटाकडून आपण काय अपेक्षा करू शकतो ? ती तर काँग्रेसीकृत झाली आहे ! जर बाळासाहेब ठाकरे जिवंत असते, तर त्यांनी सुनील राऊत यांना बुटांनी मारहाण केली असती. अखिलेश यादव, दिग्विजय सिंह, रोहित पवार यांसारखे नेतेही कुंभमेळ्याला गेले होते. सुनील राऊत त्यांनाही ‘पापी’ म्हणतील का ? ठाकरे गटाच्या आमदाराने हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत. त्यांच्यावर गुन्हा नोंद होऊन कारवाई झाली पाहिजे.’’

संपादकीय भूमिका

हिंदु धर्मातील प्रथा-परंपरांविषयी काडीमात्र ज्ञान नसतांना अशी विधाने करणे म्हणजे स्वतःचे अज्ञान पाजळल्यासारखेच आहे ! देश-विदेशातून मोठ्या प्रमाणात जनसागर कुंभक्षेत्री गंगेत स्नान करत असतांना हिंदु परंपरेवर गलिच्छ आरोप करणार्‍यांवर कठोर कारवाईच व्हायला हवी !