जळगाव – येथील धरणगाव तालुक्यात ‘हिंदु राष्ट्र फुलपाट’ अशा फलकाचे अनावरण मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे उत्तर महाराष्ट्र संघटक श्री. प्रशांत जुवेकर, श्री. विनोद शिंदे, सरपंच सौ. जागृती पाटील, सर्वश्री भूषण राजपूत, माधव राजपूत, पवन हटकर, वैभव राजपूत, चेतन राजपूत, सोपान राजपूत, दीपक राजपूत, जितेंद्र राजपूत इत्यादी उपस्थित होते.
हिंदु राष्ट्रासाठी उत्स्फूर्तपणे स्वतःहून तरुणांनी फलकाच्या अनावरणाचे नियोजन केले. फुलपाठमध्ये नियमित धर्मशिक्षणवर्ग आणि हिंदु राष्ट्रासाठी कृतीच्या स्तरावर प्रयत्न करण्यासाठी नियमित बैठकीचे नियोजनही केले आहे. या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्तपणे सहभाग होता.
क्षणचित्रे
१. एका महिलेने मनोगत व्यक्त केले की, आता महिलांनी पुढाकार घेऊन बोलण्याची सवय केली पाहिजे.
२. एका व्यक्तीच्या पायाचे शस्त्रकर्म झाले होते, तरीही ते ‘वॉकर’ घेऊन कार्यक्रमस्थळी पूर्णवेळ थांबले.
३. शेजारच्या गावातून आलेल्या काही तरुणांनी २ गावांमध्ये हिंदु राष्ट्राचे फलक लावण्याची सिद्धता दर्शवली आणि कार्य चालू करण्याची मागणी केली.