
नवी मुंबई – नेरूळ रेल्वे स्थानक पूर्व आणि पश्चिम बाजू येथील पदपथावर आणि रस्त्यावर बसणार्या अनधिकृत फेरीवाल्यांच्या विरुद्ध नेरूळ विभाग कार्यालयाच्या माध्यमातून धडक मोहीम घेण्यात आली होती. फेरीवाल्यांनी या मोहिमेमध्ये अडथळा निर्माण करून कर्मचार्यांना धमकी दिली. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
फेरीवाल्यांचा उद्दामपणा !
फेरीवाल्यांना हटवण्याचे काम चालू असताना काही उद्दाम महिला फेरीवाल्यांनी पालिकेच्या महिला सुरक्षारक्षकांवर धावून जाण्याचा प्रयत्न केला. तसेच ‘आम्ही याच ठिकाणी बसणार, तुम्हाला काय करायचे ते करा. तुम्हाला बघून घेऊ’, अशी धमकी देऊन शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला. (अशांना कारागृहातच डांबायला हवे ! – संपादक) फेरीवाले आणि महानगरपालिका कर्मचारी यांच्यात वाद होत असताना पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेत होते.