अलिबाग जिल्हा रुग्णालयात मंगळसूत्राची चोरी !
अलिबाग – गरोदरपणाच्या पडताळणीसाठी आलेल्या महिलेचे अडीच तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र चोरीला गेले आहे. हा प्रकार येथील जिल्हा रुग्णालयात घडला. याचे सीसीटीव्ही चित्रण उपलब्ध नाही. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. याआधीही येथे अशा चोरीच्या घटना झाल्या आहेत.
पनवेलमधून चोरलेल्या १५ रिक्शा बुलढाणा येथे सापडल्या !
३ धर्मांध अटकेत !
पनवेल – येथून चोरलेल्या १५ रिक्शा बुलढाणा येथून जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. निसार खान सत्तार खान (वय ३६ वर्षे), सिकंदर अख्तर कुरेशी (वय ३२ वर्षे) आणि शेख लाल शेख अफसर कुरेशी अशी त्यांची नावे आहेत. चोरीच्या रिक्शांची मेहकर (बुलढाणा) येथे विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी अन्वेषण केले.
संपादकीय भूमिका : लोकसंख्येत अल्पसंख्य असलेले मुसलमान गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य !
वायर चोरणारे धर्मांध गजाआड !
पनवेल पोलिसांकडून गाडीसह ४ धर्मांध कह्यात
पनवेल – तालुक्यातील वारदोली येथील वाधवा वाईस सिटी मॅगनोलिया या इमारतीच्या परिसरात ठेवलेल्या लाखो रुपये किमतीच्या इलेक्ट्रॉनिक्स वायर आणि इतर साहित्य चोरी केल्याप्रकरणी अवघ्या २४ घंट्यांत पनवेल तालुका पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी ४ धर्मांधांना गुन्ह्यातील गाडीसह कह्यात घेतले. सर्व चोर धारावी येथील असल्याचे समजते.
खातेदाराने परत केले १ लाख रुपये
पोलादपूर – तालुक्यातील अग्रगण्य एच्.डी.एफ्.सी. बँकेत १३ फेब्रुवारी या दिवशी दुपारी एका खातेदाराने दिलेल्या चेकवर १ लाखाची रक्कम लिहिली असतांना रोखपालाने चक्क २ लाख रुपये दिले. यानंतर रक्कम घेऊन बॅगमध्ये ठेवणार्या खातेदाराला धनादेशापेक्षा १ लाख रुपये रक्कम अधिक असल्याचे दिसून आल्याने त्याने प्रामाणिकपणे रक्कम परत केली.
कचर्याच्या जागेतून निघणार्या धुराचा त्रास
माणगाव – उतेखोल येथील आश्रमशाळेलगत असलेल्या कचर्याच्या जागेला (‘डंम्पिंग ग्रांऊड’)ला आग लावण्यात येत असल्यामुळे माणगावकरांचा श्वास कोंडत आहे. वनवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनाही याचा पुष्कळ त्रास सहन करावा लागत आहे. रात्री येथील कचर्याला आग लावली जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणत धूर होऊन विषारी वायू नागरिकांच्या घरात पसरतो.