पुणे – जिल्ह्याच्या दौर्यावर आलेले मंत्री आशिष शेलार यांनी पुणे जिल्ह्यातील राज्यशासन संरक्षित स्मारकांच्या कामांची बैठक घेऊन आढावा घेतला. पुरातत्व विभागाच्या वतीने या परिसराचा विकास करण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यात ३९ स्मारके राज्य संरक्षित असून यातील तोरणा, राजगडासह अन्य स्मारकांच्या डागडुजीची जी कामे चालू आहेत, त्यांचाही आढावा या वेळी घेतला. या वेळी संचालक तेजस गर्गे, साहाय्यक संचालक विलास वहाणे आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.