जी.एस्.टी. गुप्तचर महासंचालनालयाकडून जी.एस्.टी. घोटाळा उघडकीस

(प्रतिकात्मक छायाचित्र)

पुणे – जी.एस्.टी. गुप्तचर महासंचालनालय (डीजीजीआय) च्या पुणे विभागीय शाखेने १ सहस्र १९६ कोटी रुपयांचा जी.एस्.टी. घोटाळा उघडकीस आणला आहे. पुणे, देहली, नोएडा आणि मुजफ्फरनगर येथील अनेक ठिकाणी धाडी घालून केलेल्या अन्वेषणात बनावट इम्पोर्ट टॅक्स क्रेडिट (आयटीसी) व्यवहारांमध्ये सहभागी बनावट आस्थापनांचे जाळे समोर आले आहे. या प्रकरणी एका व्यक्तीला कह्यात घेतले असून ती या प्रकरणामागील सूत्रधार आहे. आरोपींनी जी.एस्.टी. नोंदणीच्या कायदेशीर परिणामांची माहिती नसलेल्या आणि संशय येणार नाही अशा कर्मचार्‍यांच्या वैयक्तिक माहितीचा अपवापर केला. अन्वेषण अधिकार्‍यांनी बनावट आस्थापनांशी संलग्न असलेले बँक खाते गोठवले आहे.