अमेरिकेतील जॉर्जिया राज्यातील विधानसभेत हिंदुद्वेषाची निंदा करणारा प्रस्ताव संमत !

जॉर्जिया राज्याच्या विधानसभेचे हिंदूंकडून आभार ! जेथे हिंदूंचा द्वेष करण्याचा प्रयत्न एका षड्यंत्राद्वारे केला जातो, अशा ठिकाणी असा प्रयत्न सगळ्यांनी करण्याची आवश्यकता आहे !

विधवा प्रथेच्या विरोधात गोवा राज्यात कायदा करणार ! – महिला आणि बालविकास मंत्री विश्वजीत राणे

असाच कायदा हिजाब, बुरखा, हलाला पद्धत यांविरोधात करणार का ? विधवा धर्माचे पालन करणे, हे प्रत्येकाचे व्यक्तीस्वातंत्र्य असल्याने कुणाला विधवा धर्माचे पालन करायचे असल्यास कायदा तिला तसे करण्यापासून रोखणार का ?

गोव्यात ‘पी.एफ्.आय.’च्या कारवायांना थारा देणार नाही ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

‘पी.एफ्.आय.’ ही संघटना पाकिस्तान या शत्रूराष्ट्राचा झेंडा लावत आहे, तरीही आम्ही गप्प का बसतो ? असा संतप्त प्रश्न आमदार कृष्णा साळकर यांनी चर्चेच्या वेळी उपस्थित केला. ‘पी.एफ्.आय.’वर विधानसभेत प्रश्न उपस्थित करणार्‍या आमदारांचे अभिनंदन !

सिंधुदुर्ग : नरडवे धरण प्रकल्पाचे काम पोलीस बंदोबस्तात चालू केल्याने संतप्त प्रकल्पग्रस्तांचा तीव्र विरोध

शेकडो ग्रामस्थांनी ठेकेदार आस्थापनाच्या कार्यालयाच्या बाहेर ठिय्या आंदोलन केले. ‘प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या प्रथम पूर्ण करा आणि त्यानंतरच कामाला प्रारंभ करा’, अशी मागणी ग्रामस्थांनी लावून धरली.

प्रा. वेलिंगकर यांच्या मातृभाषा आंदोलनावरील ‘लोटांगण’ पुस्तकाचे उद्या प्रकाशन

हितचिंतकानी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून गोव्यातील एका ज्वलंत चळवळीवर प्रकाशझोत टाकणार्‍या ‘लोटांगण’च्या विमोचन कार्यक्रमास प्रतिसाद द्यावा, असे आवाहन प्रकाशक श्रीविद्या प्रतिष्ठान आणि लेखक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी केले आहे.

आग्वाद किल्ल्यातील मद्यविक्री केंद्राचा ‘ना हरकत दाखला’ सरकारने मागे घेतलेला नाही

या ऐतिहासिक वारसा स्थळामध्ये मद्यविक्री दुकान चालू करणे हा स्वातंत्र्यसैनिकांचा अवमान आहे आणि हे केंद्र त्वरित बंद करावे, अशी मागणी स्वातंत्र्यसैनिक संघटना आणि जागरूक नागरिक यांनी केली होती.

देशाचे वाटोळे होण्यामागील कारण !

‘लोकशाहीला जात्यंध आणि भ्रष्टाचारी जनता लायक नसल्याने देशाचे वाटोळे झाले आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

#Exclusive : रत्नागिरी बसस्थानकाच्या प्रवेशद्वारातच सोडले जाते मुतारीचे सांडपाणी !

‘आर्थिक गर्तेत सापडलेल्या ‘आपल्या’ एस्.टी.ला पुन्हा गतवैभव प्राप्त व्हावे’, अशीच सर्वसामान्यांची भावना आहे. या वृत्तमालिकेच्या माध्यमातून एस्.टी.च्या पुनरुत्थानासाठी चळवळ उभी रहावी, हाच आमचा प्रामाणिक हेतू आहे.

हिंदु जनजागृती समितीकडून साध्वी सत्यप्रिया यांची सदिच्छा भेट

‘दुर्गा वाहिनी’च्या साध्वी ऋतंभरा यांच्या कृपाप्राप्त साध्वी सत्यप्रिया यांच्या श्रीरामकथा वाचनाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या सौ. संदीप कौर मुंजाल यांनी साध्वी सत्यप्रिया यांची भेट घेतली.