असुरक्षित पुणे विमानतळ !
पुणे – विमानतळावर एका प्रवाशाच्या पिशवीत बंदुकीचे मॅगझीन आणि २८ जिवंत काडतुसे मिळाली. दीपक काटे हा प्रवासी ५ जानेवारीला सकाळी १०:४५ वाजता भाग्यनगरला जाण्यासाठी पुणे विमानतळावर आला. सुरक्षारक्षकांनी त्याच्या साहित्याची पडताळणी केली असता पिशवीत बंदुकीचे मॅगझीन आणि २८ जिवंत काडतूसे मिळाली. त्यामुळे सुरक्षारक्षकांनी दीपक काटे याला पोलिसांकडे सुपुर्द केले. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी गुन्हा नोंद करून दीपक काटेला कह्यात घेतले आहे. पुढील अन्वेषण चालू आहे.