गाडीचे हप्ते थकल्याने क्रमांक पालटले
मुंबई – येथील ताज हॉटेलमध्ये एकाच क्रमांकाच्या २ चारचाकी आढळून आल्या. सुरक्षारक्षकाने याविषयी पोलिसांना कल्पना दिली. पोलिसांनी प्रादेशिक परिवहन विभागातील संबंधितांना बोलावून बनावट क्रमांकाची चारचाकी असणार्या चालकाला कह्यात घेतले. दोन्ही चारचाकींवर ‘MH 01 EE 2388’ हा क्रमांक होता. गाडीचे हप्ते थकल्याने गाडीचा क्रमांक पालटल्याचे पोलिसांच्या चौकशीतून उघड झाले. गाडी मालकाचे नाव प्रसाद कदम असून त्याच्या गाडीचे ६ हप्ते थकले होते; म्हणून फायनान्स आस्थापनाने गाडी जप्त केली होती. ही गाडी सोडवून आणल्यावर पुन्हा जप्तीच्या कारवाईपासून वाचण्यासाठी चालकाने हा प्रकार केला. मूळ मालकाने तक्रारही केली होती.