बिहारमधून इयत्ता ११ वीतील विद्यार्थ्याला अटक !

महाकुंभपर्यात घातपात घडवण्याची धमकी दिल्याचे प्रकरण

प्रतिकात्मक छायाचित्र

प्रयागराज – महाकुंभ मेळ्यात घातपात घडवण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणी प्रयागराज पोलिसांनी बिहार राज्यातील पुर्णिया येथील शहीदगंज येथून इयत्ता ११ वीतील विद्यार्थ्याला अटक केली. त्याने त्याच्या नासर पठाण नावाच्या मित्राला फसवण्यासाठी त्याच्या नावे इन्स्टाग्रामवर बनावट खाते बनवून ही धमकी दिल्याचे पोलीस चौकशीत निष्पन्न झाले. आरोपीला प्रयागराज येथे आणून त्याची सखोल चौकशी केली जाईल, अशी माहिती सह पोलीस अधीक्षक राजेश कुमार द्विवेदी यांनी दिली.