Naxal blast : छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी घडवलेल्या स्फोटात ८ सैनिकांना वीरमरण

विजापूर (छत्तीसगड) – येथे ६ जानेवारीला दुपारी २.१५ च्या सुमारास नक्षलग्रस्त भागात तपासणी करून चारचाकी वाहनातून परत येत असतांना रस्त्याच्या खाली लपसून ठेवलेल्या बाँबच्या झालेल्या स्फोटात ८ सैनिकांना वीरमरण आले. तसेच एका चालकाचाही मृत्यू झाला.

बस्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक सुंदरराज पी. यांनी सांगितले की, विजापूरमधील संयुक्त ऑपरेशन पथक तपासणी करून परतत होते. त्या वेळी नक्षलवाद्यांनी आंबेली गावाजवळ स्फोट घडवून आणला. आदल्या दिवशीच विजापूरमध्ये नक्षलवाद्यांसमवेत झालेल्या चकमकीत ३ नक्षलवादी ठार झाले होते, तर एका सैनिकाला वीरमरण आले होते.