|
पुणे – पोलिसांत तक्रार केल्याच्या रागातून विवाहितेच्या घरामध्ये घुसून धर्मांधांने ‘ब्लेड’ने वार केले. लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत तिच्या मुलाला आणि पतीला जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी महंमद जानी जिलानी शेख याच्या विरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (घरामध्ये घुसून मारहाण करण्यापर्यंत धर्मांधांची मजल जाते ! धर्मांधांचा वाढता उद्दामपणा रोखण्यासाठी त्यांना कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे ! – संपादक) त्याच्या विरोधात २६ वर्षीय महिलेने तक्रार प्रविष्ट केली आहे.
३ जानेवारी या दिवशी तक्रारदार महिला आपल्या २ मुलांसह घरी होती. आरोपीने दुपारी घरामध्ये शिरून त्यांना मारहाण केली. हा प्रकार घडत असतांना महिलेने आरडाओरडा केला. हा प्रकार शेजार्यांच्या लक्षात येताच त्यांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या कह्यात दिले. (हिंदु महिला घरामध्येही सुरक्षित नाहीत. यावरून हिंदु महिलांनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे ! – संपादक)