धर्मवीर संभाजी महाराज समस्त हिंदुजनांचे दैवत ! – राजेश क्षीरसागर, अध्यक्ष, राज्य नियोजन मंडळ

बलीदानदिनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना शिवसेनेच्या वतीने विनम्र अभिवादन !

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन करतांना राजेश क्षीरसागर, तसेच अन्य शिवसैनिक

कोल्हापूर – छत्रपती संभाजी महाराज यांनी सर्व सुखांचा त्याग करून निरंतर ९ वर्षे स्वराज्याच्या रक्षणासाठी संघर्ष केला. छत्रपती संभाजी महाराज हे शूर, पराक्रमी तर होतेच, तसेच रयतेच्या हिताला प्राधान्य देणारे आदर्श अधिपती होते. अशा या महापराक्रमी झुंझार महाराजांचे स्वराज्याप्रती असणारे प्रेम, निष्ठा, शौर्य आणि बलीदान अजरामर असून धर्मवीर संभाजी महाराज समस्त हिंदुजनांचे दैवत आहेत, असे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांनी केले. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलीदानदिनी शिवसेनेच्या वतीने पापाची तिकटी येथील स्मारकास अभिवादन करण्यात आले. त्या प्रसंगी ते बोलत होते.

या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, महानगरसमन्वयक जयवंत हारुगले, उत्तर शहरप्रमुख रणजीत जाधव, दक्षिण शहरप्रमुख महेंद्र घाटगे, उपजिल्हाप्रमुख उदय भोसले, किशोर घाटगे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.