तुष्टीकरणाचे राजकारण करणार्‍या पक्षांना घरचा अहेर : तेलंगाणात मोठा फटका !

मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि तेलंगाणा या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत यंदा मोठा पालट दिसून आला. तुष्टीकरणाचे राजकारण करणार्‍या पक्षांना जनतेने घरचा अहेर दिला.

संपादकीय : निकालाचा मतीतार्थ !

चार राज्यांच्या निवडणुकीचा निकाल म्हणजे ‘काँग्रेसमुक्त भारत’च्या दिशेने पडलेले आणखी एक पाऊल आहे. २ राज्यांमध्ये जनतेने झिडकारल्याने सत्ता गमावणारी काँग्रेस या पराभवानंतर आत्मपरीक्षण करील का ? या निकालांद्वारे सामान्य लोकांनी त्यांना काय हवे आहे’, याविषयी मतपेटीद्वारे संदेश दिला आहे.

Freebies To Muslims : (म्हणे) ‘मुसलमान तरुणांसाठी विशेष ‘आयटी पार्क’ बनवणार !’ – मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव

मदरशांमध्ये शिकणारे मुसलमान आयटी पार्कमध्ये कधीतरी रोजगार मिळवू शकतील का ? ‘हिंदूंच्या रोजगारासाठी चंद्रशेखर राव काही करणार आहेत का ?’, अशी विचारणा राज्यातील हिंदू त्यांना का करत नाहीत ?

५०० गाड्यांचे शक्‍तीप्रदर्शन करत तेलंगाणाचे मुख्‍यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे सोलापुरात आगमन !

देवाला भक्‍तीभाव हवा असतो आणि वारकरी हा अत्‍यंत लीन असतो. त्‍यामुळे पंढरपूरच्‍या विठ्ठलाच्‍या दर्शनासाठी येतांना हा बडेजाव आणि शक्‍तीप्रदर्शन कशासाठी ? असा प्रश्‍न सामान्‍य नागरिकांच्‍या मनात उपस्‍थित होत आहे !

तेलंगाणा सरकारकडून रमझानच्या काळात मुसलमान कर्मचार्‍यांना १ घंटा आधी घरी जाण्याची अनुमती

यापूर्वी बिहार सरकारनेही असा निर्णय घेतला आहे. तेथे एक घंटा आधी कामावर उपस्थित रहाण्यास सांगण्यात आले आहे.

तेलंगाणातील सत्ताधारी पक्षाच्या नेत्या के. कविता यांची चौकशी !

देहली येथील अबकारी धोरण, म्हणजेच मद्य घोटाळ्याच्या प्रकरणात ही चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणी त्यांना अटक होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

‘भारत राष्‍ट्र समिती’ या पक्षाच्‍या फलकावरील भारताच्‍या मानचित्रात (नकाशात) जम्‍मू-काश्‍मीरचा भाग वगळला !

तेलंगाणातील निझामाबादचे भाजपचे खासदार अरविंद धर्मपुरी यांनी ‘तेलंगाणाचे मुख्‍यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा नवा राष्‍ट्रीय पक्ष ‘भारत राष्‍ट्र समिती’च्‍या फलकावरील भारताच्‍या मानचित्रात (नकाशात) काश्‍मीरचा भाग वगळण्‍यात आल्‍याचे दाखवण्‍यात आले आहे’, असा आरोप केला आहे.

‘तेलंगाणा राष्ट्र समिती’चे नाव आता ‘भारत राष्ट्र समिती’ !  

आता राज्यात पक्षाने केलेल्या कल्याणकारी योजनांची माहिती संपूर्ण देशभरात सांगण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. 

पंतप्रधानांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित केलेल्या बैठकीला तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव अनुपस्थित रहाण्याची शक्यता

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ६ ऑगस्ट २०२२ या दिवशी नवी देहली येथे आयोजित केलेल्या ‘आझादी का अमृत महोत्सव’च्या राष्ट्रीय समितीच्या बैठकीला तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव अनुपस्थित रहाण्याची शक्यता आहे.