नागपूर येथे कार्यक्रम
नागपूर, ११ मार्च (वार्ता.) – घराला सावरणारी स्त्री असते, तर घराला उद्ध्वस्त करणारीही स्त्रीच असते. हल्ली आधुनिकतेच्या नावाखाली बहुतांश स्त्रियांनी धर्माचरण करणे सोडले आहे. ही परिस्थिती पालटायला हवी, अन्यथा कुटुंबव्यवस्था धोक्यात येईल. घरातील स्त्री धर्माचरणी असेल, तर कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती धर्माचरण करून समाजात आदर्श निर्माण करणारी असते. ज्या घरातील स्त्री धर्माचरणी असेल, ते कुटुंब आनंदी, सात्त्विक, समाधानी आणि आदर्श कुटुंब असते, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीच्या सौ. गौरी जोशी यांनी केले. ९ मार्च या दिवशी येथील ‘सर्वभाषीय परशुराम ब्राह्मण संघ, महिला मंच’च्या वतीने महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या प्रमुख वक्त्या होत्या. मंडळाच्या सदस्यांनी याचा लाभ घेतला.
विशेष
१. ग्रामपंचायत सदस्या आणि धनलक्ष्मी बचत गटाच्या अध्यक्षा सौ. सीमा अनिल शर्मा यांचे विशेष साहाय्य लाभले.
२. व्यासपिठावर सौ. सीमा अनिल शर्मा, संतोष राणी शर्मा, सौ. रेखा चतुर्वेदी, डॉ. प्रभावती वाजपाई, सौ. जयमाला तिवारी, सौ. नम्रता भगत या मान्यवर उपस्थित होत्या.
क्षणचित्रे
१. विषय आवडल्याने अनेकांनी समितीच्या कार्यात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली.
२. ‘लव्ह जिहाद’चा सविस्तर विषय जाणून घेण्यासाठी स्वतंत्र कार्यक्रम आयोजित करू’, असे आयोजकांनी सांगितले.