श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात १५० जणांकडून रक्तदान !

प्रतिकात्मक छायाचित्र

पलूस (जिल्हा सांगली) – छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा बलीदान मास यांच्या निमित्ताने श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने १० मार्चला रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात १५० जणांनी रक्तदान केले. या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, तसेच अन्य देवता यांच्या रांगोळ्या रेखाटण्यात आल्या होत्या.