तेलंगाणातील सत्ताधारी पक्षाच्या नेत्या के. कविता यांची चौकशी !

मुख्यमंत्र्यांच्या कन्या के. कविता

भाग्यनगर – तेलंगाणातील सत्ताधारी भारत राष्ट्र समितीच्या नेत्या आणि मुख्यमंत्र्यांच्या कन्या के. कविता यांची ११ मार्चला देहलीच्या अंमलबजावणी संचालनालयात चौकशी करण्यात आली. त्यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते. देहली येथील अबकारी धोरण, म्हणजेच मद्य घोटाळ्याच्या प्रकरणात ही चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणी त्यांना अटक होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. मद्य घोटाळ्याच्या प्रकरणात अलीकडेच भाग्यनगर येथील अरुण पिल्लई यांना अटक करण्यात आली होती. पिल्लई हे कविता यांचे निकटवर्तीय समजले जातात.

देहली येथील मद्यावरील अबकारी कर अल्प करण्यात आला होता. महसूल मिळण्यासाठी हा कर अल्प करण्यात आल्याचे आप सरकारकडून सांगण्यात आले होते; मात्र याचा थेट लाभ मद्य उद्योजकांना झाला. त्यामुळे या प्रकरणात घोटाळा झाल्याचा ठपका आप सरकारवर ठेवण्यात आला. या प्रकरणी आपचे माजी मुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक करण्यात आली आहे.

(सौजन्य : Republic Bharat) 


काय आहे देहली मद्य घोटाळा ?

_________________________________________________