(म्हणे) ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या आयोजकांवर कारवाई करा ! – एस्.डी.पी.आय.

भारताला ‘इस्लामी देश’ बनवण्याच्या जिहाद्यांच्या ध्येयाविषयी ‘ब्र’ही न काढणारे हिंदु राष्ट्राला विरोध करतात, हे लक्षात घ्या !

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या कागल (जिल्हा कोल्हापूर) येथील घरावर ‘ईडी’ची धाड !

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी धाड घातली. २ मासांत ‘ईडी’ने मुश्रीफ यांच्यावर केलेली ही तिसरी कारवाई आहे.

देहलीमध्ये होळीच्या वेळी जपानी तरुणीला बलपूर्वक रंग लावून छेडछाड !

हिंदूंच्या सणाच्या नावाखाली अशी विकृती करणार्‍यांना कठोर शिक्षा होणे आवश्यक ! हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने ‘सण कसे साजरे करावेत’, हेही त्यांना ठाऊक नाही !

पाकमधील शाळकरी मुलांना दिले जाते भारतविरोधी आणि हिंदुविरोधी शिक्षण !

पाकमधील जनता हिंदुविरोधी आणि भारतविरोधी असण्यामागे हे एक कारण आहे. पाकशी मैत्री करण्याची इच्छा बाळगणार्‍या भारतातील पाकप्रेमींना याविषयी काय म्हणायचे आहे ?

रायपूर (छत्तीसगड) येथे देवतांची चित्रे असणारी भित्तीपत्रके फाडणार्‍या मुसलमानानांना अटक

छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे सरकार असल्यामुळेच धर्मांधांचे फावते आहे. हिंदूंनी हे लक्षात घेऊन अशा पक्षाला सत्तेतून खाली खेचणेच योग्य !

टिकैत कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी देणार्‍याला अटक

भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष चौधरी राकेश टिकैत आणि त्यांचे कुटुंब यांना बाँबने उडवून देण्याची धमकी देणार्‍याला पोलिसांनी देहलीतून अटक केली आहे.

पी.एफ्.आय.ला संयुक्त अरब अमिरातमधून करण्यात येत होता अर्थपुरवठा !

जिहादी आतंकवाद्यांना इस्लामी देशांतून अर्थपुरवठा होतो, हे आता उघड झाले आहे. भारताला इस्लामी राष्ट्र बनवण्याचाच हा प्रयत्न आहे. हे रोखण्यासाठी हिंदूंनी संघटित होऊन हिंदु राष्ट्राची स्थापना करणे अपरिहार्य आहे !

चौकशीसाठी स्थापन झालेल्या संसदीय समितीवर आक्रमण

त्रिपुरामध्ये विधानसभा निवडणुकीनंतरच्या हिंसाचाराचे प्रकरण

राष्ट्रपती शी जिनपिंग यांचे विश्‍वासू ली किआंग चीनचे नवे पंतप्रधान !

चीनमध्ये शून्य कोविड धोरणाचे प्रणेते ली किंअंग हेच आहेत. ही योजना अयशस्वी झाली, तरीही केवळ शी जिनपिंग यांच्या विश्‍वासातील असल्याने त्यांना पंतप्रधानपदी नियुक्त करण्यात आले आहे.

(म्हणे) ‘सिंध भूमी सुफी फकिरांची असल्याने येथे हिंदु होळी खेळू शकत नाहीत !’ – मौलाना महमूद

ज्या सिंधवरून भारताला ओळखले जात होते तेथे आज हिंदूंची झालेली ही स्थिती हिंदूंना लज्जास्पद आहे ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !