वर्ष २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्रशासनाने सर्व हिंदुविरोधी कायदे रहित करावेत ! – पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन, सर्वोच्च न्यायालय

श्रीराम, श्रीकृष्ण, शीव आणि शक्ती यांचे अस्तित्व या देशाच्या कणाकणांत आहे. भारतभूमीत जन्म घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीला त्यांचा आदर करावाच लागेल !

प्राचीन धर्मशास्त्रांच्या आधारावर भारतीय राज्यघटना सिद्ध करण्यात यावी !

ज्याप्रमाणे जनहित आणि राष्ट्रहित यांविषयी विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी लोकप्रतिनिधींची संसद अस्तित्वात आहे. त्याप्रमाणेच धर्महिताच्या विषयावर चर्चा करण्यासाठी धर्मप्रतिनिधींची ही हिंदु राष्ट्र संसद आहे.

वेंगुर्ला येथे फलटण येथून पळून आलेली अल्पवयीन मुलगी पोलिसांच्या कह्यात, तर समवेतचा युवक पसार

सध्या धर्मशिक्षणासह नैतिक मूल्यांचे शिक्षण देणारी व्यवस्था उद्ध्वस्त होऊ लागल्याने असे प्रकार वरचेवर घडत आहेत. सरकारच्या विकासाभिमुख कार्याला नीतीमूल्यांचा आधार नसल्यास समाजाची घसरण होते, हे अशा घटनांतून लक्षात येते !

राष्ट्रीय स्तरावर धर्मांतर रोखण्यासाठी कायद्यासह घटनादुरुस्तीची आवश्यकता ! – श्री. एम्. नागेश्वर राव, माजी प्रभारी महासंचालक, केंद्रीय गुन्हे अन्वेषण यंत्रणा

धर्मांतर रोखण्यासाठी हिंदूंमध्ये धर्मजागृती करून त्यांना धर्मशिक्षण दिले पाहिजे. धर्मशिक्षण घेऊन धर्माचरण प्रारंभ केल्यास कोणीही धर्मांतर करू शकणार नाही !

अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांची शंखवाळी येथील ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या वारसास्थळाला भेट

चर्च संस्था शासकीय अधिकार्‍यांवर दबाव आणून गेल्या काही वर्षांपासून ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ हे वारसा स्थळ कह्यात घेण्यासाठी विविध गैरकृत्ये करत आहे. या पार्श्‍वभूमीवर मान्यवरांनी या  परिसराचे निरीक्षण केले.

अधिवेशनस्थळी लावलेले बंगाली हिंदूंवरील अत्याचारांविषयीचे प्रदर्शन पाहून हिंदुत्वनिष्ठांचे डोळे पाणावले !

‘बंगाली हिंदूंवर झालेले अत्याचार लोकांसमोर आणणारे हे पहिलेच प्रदर्शन आहे’, असे ‘पश्चिमबंगेर जन्य’ या संघटनेने सांगितले. हे प्रदर्शन पाहून अनेक हिंदुत्वनिष्ठांच्या डोळ्यांत पाणी आले.

हिंदु धर्माचे मूल्य नसलेले भारतातील हिंदू !

‘उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला प्रयाण करतात, त्याप्रमाणे साधना आणि हिंदु धर्म यांच्या शिक्षणासाठी जगभरचे जिज्ञासू अन् साधक भारतात येतात. असे असले, तरी भारतातील हिंदूंना हिंदु धर्माचे मूल्य नाही.’

संत तुकाराम महाराजांचे अभंग आजही प्रेरणादायी ! – पंतप्रधान मोदी

पंतप्रधानांच्या हस्ते देहू (पुणे) येथील तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण, संत तुकाराम महाराज यांच्या पालखी मार्गाचे काम ३ टप्प्यांत पूर्ण करणार !

अज्ञातांकडून ठाणे पोलिसांचे संकेतस्थळ ‘हॅक’ !

हिंदूंनो, संकेतस्थळे ‘हॅक’ करण्याच्या माध्यमातून धर्मांध देत असलेली चेतावणी लक्षात घेऊन संघटित व्हा !

दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाला उपस्थित संत आणि हिंदुत्वनिष्ठ यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट !

दहाव्या अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनातीलच नव्हे, तर सर्वत्रच्या हिंदुत्वनिष्ठ संघटना, त्यांचे प्रतिनिधी, राष्ट्रप्रेमी संस्था यांनी सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार कार्यरत होणे आवश्यक आहे. – सद्गुरु श्री. नवनीतानंद (गुरुवर्य पू. मोडक) महाराज