अज्ञातांकडून ठाणे पोलिसांचे संकेतस्थळ ‘हॅक’ !

  • जगभरातील मुसलमानांची माफी मागण्याची ‘हॅकर्स’ची मागणी

  • ६ घंट्यानंतर संकेतस्थळ पुन्हा चालू

ठाणे, १४ जून (वार्ता.) – जगभरातील मुसलमानांची माफी मागा, अशी मागणी करत एका ‘हॅकर’ टोळीने ठाणे शहर पोलिसांचे संकेतस्थळ ‘हॅक’ केले. १४ जूनच्या सकाळी हा प्रकार समोर आला. ६ घंट्यानंतर हे संकेतस्थळ पुन्हा चालू झाले. या वेळी संकेतस्थळावर साठवलेली सर्व माहितीही पुन्हा मिळवण्यात आली. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील अन्वेषण चालू आहे.

ठाणे शहर पोलिसांच्या ‘सायबर सेल’ विभागाच्या समाजमाध्यम पथकाचे काही कर्मचारी नेहमीप्रमाणे ठाणे पोलिसांच्या कामगिरीची छायाचित्रे प्रसारित करत होते. तेव्हा संकेतस्थळावर ‘वन बॅट सायबर टीम-इंडोनेशियन डिफेसर’ असा उल्लेख निदर्शनास आला. या घटनेनंतर हा प्रकार कुणी आणि का केला ? याचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. संकेतस्थळ पुन्हा चालू झाल्यानंतर मात्र हा संदेश नष्ट झाला.

(टीप : ‘हॅक’ म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून संकेतस्थळावरील माहिती चोरणे किंवा संकेतस्थळ बंद पाडणे. असे कृत्य करणाऱ्यांना ‘हॅकर्स’ म्हणतात.)

संपादकीय भूमिका 

हिंदूंनो, संकेतस्थळे ‘हॅक’ करण्याच्या माध्यमातून धर्मांध देत असलेली चेतावणी लक्षात घेऊन संघटित व्हा !