कानपूर येथील हिंसाचाराच्या मागे पाकिस्तानचा हात असल्याचा संशय

पाकमधून भारतात हिंसाचार घडवण्यात येत असेल, तर भारताची अंतर्गत सुरक्षा किती कुचकामी आहे, हे लक्षात येते ! उद्या पाकशी युद्ध झाल्यास धर्मांध अशा प्रकारचे उठाव करू लागले, तर ते पोलिसांना पेलवणार आहे का ? याचा विचार आतापासूनच केला पाहिजे !

भाजप पाकव्याप्त काश्मीरमधील शारदा पीठ मुक्त करण्याचे सूत्र निवडणुकीत घेण्याच्या सिद्धतेत !

जम्मू-काश्मीरच्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपकडून पाकव्याप्त काश्मीरमधील शारदा पिठाचे सूत्र उपस्थित करून प्रचार करण्याची सिद्धता होत आहे.

अभिनेते संजय दत्त कपाळावर टिळा आणि शेंडी ठेवलेल्या खलनायकाच्या भूमिकेत !

खलनायक हे ब्राह्मण, साधू, संत, पुजारी अशा भूमिकेत दाखवून हिंदी चित्रपटसृष्टी अनेक वर्षांपासून हिंदु धर्माची अपकीर्ती करत आली आहे. आता यावर कायमस्वरूपी प्रतिबंध घालणे आवश्यक आहे.

पाकिस्तान पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट-बाल्टिस्तान चीनला देण्याच्या सिद्धतेत !

असे झाल्यास भारताला चीनपासून आधीच असलेला धोका आणखी वाढेल. अशा कुरापतखोर पाकला भारत कसा धडा शिकवणार आहे ?

हिंसेसाठी चिथावणी देणे, हे शांतता, सहिष्णुता आणि सद्भाव यांच्या विरोधी ! – भारत

द्वेष पसरवणारी भाषणे आणि भेदभाव यांच्या विरोधात अभियान राबवतांना काही निवडक धर्म अन् समुदाय यांच्यापुरते सीमित न रहाता यामध्ये सर्व प्रभावितांना सहभागी करून घेण्याचे संयुक्त राष्ट्रांचे दायित्व आहे.

‘मुसलमानांना एक घंटा द्या, एकही हिंदुत्वनिष्ठ जीवंत रहाणार नाही, याची मी निश्‍चिती देते !’

यापूर्वी अकबरूद्दीन ओवैसी यांनीही ‘१५ मिनिटांसाठी पोलिसांना बाजूला करा, आम्ही ७५ कोटी हिंदूंना संपवू’, अशा आशयाची धमकी दिली होती. आता जन्नत अलिमा यांनीही अशाच प्रकारची धमकी दिली आहे. यावरून अशा मुसलमान नेत्यांची हिंदूंना संपवण्याची किती सिद्धता आहे, हे स्पष्ट होते !

नौदलाचे आजी-माजी सैनिक आता मर्चंट नेव्हीमध्ये काम करू शकतात !

असा करार भारतीय नौदल आणि नौवहन संचालनालय यांच्यात झाला आहे.

रशियामध्ये भारतीय ‘रिटेल चेन्स’ उघडण्यासाठी पुतिन आणि मोदी यांच्यात चर्चा !

आम्ही भारताला तेलाचा विक्रमी पुरवठा केला आहे. आता आम्ही भारतीय ‘रिटेल चेन्स’ उघडण्याविषयी चर्चा करत आहोत, असे वक्तव्य रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी केले.

गौहत्ती (आसाम) येथे शिवसेनेचे आमदार रहात असलेल्या हॉटेलबाहेर तृणमूल काँग्रेसचे आंदोलन

महाराष्ट्रातील राजकीय पेच हा आसाममधील गौहत्तीपर्यंत पोचला आहे. एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या आमदारांसह येथील ‘रॅडिसन ब्लू हॉटेल’मध्ये थांबले आहेत. याविरोधात तृणमूल काँग्रेसकडून हॉटेलबाहेर आंदोलन करण्यात आले.

भारतीय फूटबॉल महासंघाने खेळाडूंना प्रेरित करण्यासाठी घेतले ज्योतिष आस्थापनाचे साहाय्य !

प्रारब्ध, देवाण-घेवाण आदी सूक्ष्मातील गोष्टींचा मानवी जीवनावर होत असलेला परिणाम बुद्धीने जाणून घेण्याचे उत्कृष्ट माध्यम म्हणजे ज्योतिषशास्त्र ! हिंदूंमधील धर्मशिक्षणाच्या अभावामुळे अशा घटनांना विरोध केला जातो !