सातारा, ५ ऑक्टोबर (वार्ता.) – ‘युनेस्को’चे पथक ४ ऑक्टोबर या दिवशी सातारा जिल्हा दौर्यावर आले होते. या पथकाने प्रतापगड येथे भेट देऊन ऐतिहासिक वास्तू आणि गडाची पहाणी करत माहिती जाणून घेतली. गडाची तटबंदी आणि अन्य वास्तू दीर्घ काळापासून सुस्थितीत असल्याचे पाहून पथकाने तेथील सेवेकर्यांचे कौतुक केले. पथकाकडून गडावरील स्वच्छता व्यवस्थापन, मुख्य दरवाजा, चोर वाटा, बुरुज, तटबंदी, सुशोभीकरणाची कामे इत्यादींची पहाणी करून माहिती घेण्यात आली. पथकाने तेथील स्थानिक रहिवाशांशी संवाद साधला.