राज्य शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना निवेदन
मुंबई – ‘स्टुडंट इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया’ या संघटनेने ‘शाळा-महाविद्यालयांत कुराणाचे मार्गदर्शन’ ही राष्ट्रव्यापी मोहीम चालू केली आहे. त्यासंदर्भातील वृत्त दैनिक ‘सकाळ’मध्ये २७ सप्टेंबर या दिवशी प्रसिद्ध झाले होते. राज्यघटनेनुसार भारतात सर्वधर्मसमभाव असतांना एका धर्माच्या धार्मिक ग्रंथाविषयी शाळा-महाविद्यालयांत मार्गदर्शन करणे, हे राज्यघटनाविरोधी आहे. या संदर्भात कोणतेही मार्गदर्शक तत्त्व नाही. अशाने धार्मिक तेढ वाढून अशांतता निर्माण होईल; म्हणून अशा मार्गदर्शनाला अनुमती देऊ नये, याविषयीचे निवेदन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना ३ ऑक्टोबर या दिवशी हिंदु राष्ट्र समन्वय समितीकडून देण्यात आले. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या शासकीय निवास्थानाच्या प्रांगणात ‘फुलोरा फाऊंडेशन’च्या वतीने मुलांसाठी आयोजित कार्यक्रमाच्या वेळी निवेदन देण्यात आले. फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी उपमहापौर बाबुभाई भवानजी यांनी समितीला कार्यक्रमाचे निमंत्रण दिले होते. या वेळी समितीचे शिष्टमंडळ यामध्ये सहभागी झाले होते. समितीचे श्री. रविंद्र दसारी, श्री. मनीष सैनी, श्री. सतिश सोनार आणि सौ. धनश्री केळशीकर उपस्थित होत्या.
Hindu Rashtra Samanvay Samiti opposes the campaign to promote Qur@n in schools and colleges by Mu$l!m organization.
▫️Memorandum handed over to the @dvkesarkar #EducationMinister Maharashtra
👉 When lessons of Shrimad Bhagavad Gita in schools, is criticized as saffronization… pic.twitter.com/guquepCRZy
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 5, 2024
निवेदनात पुढे म्हटले आहे की, असे कार्यक्रम आयोजित न करण्याविषयी संबंधित संघटना आणि सर्व शाळा-महाविद्यालये यांना याविषयीच्या सूचना देण्यात याव्यात. संबंधित निवेदनाप्रमाणे कार्यवाही न झाल्यास हिंदु राष्ट्र समन्वय समिती या संदर्भात आंदोलन उभे करेल, असेही निवेदनात म्हटले आहे.
संपादकीय भूमिका
|