अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांची शंखवाळी येथील ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या वारसास्थळाला भेट

सांकवाळ तीर्थक्षेत्रावरील पुरातन श्री विजयादुर्गा माता

रामनाथी (गोवा), १४ जून (वार्ता.) – काशी विश्‍वनाथ मंदिर अतिक्रमणमुक्त होण्यासाठी ज्ञानवापी मशिदीच्या विरोधात न्यायालयीन लढा देत असलेले ‘हिंदु फ्रंट फॉर जस्टिस’चे प्रवक्ते तथा सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता विष्णु शंकर जैन, वाराणसी येथील अधिवक्ता मदन मोहन यादव, गोवा येथील ‘भारत माता की जय’ संघाचे संघचालक प्रा. सुभाष वेलिंगकर आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. सत्यविजय नाईक यांनी १४ जून या दिवशी सकाळी शंखवाळी (सांकवाळ) येथील ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ हे वारसा स्थळ (पुरातन श्री विजयादुर्गा मंदिराची भूमी) आणि फोंडा येथील साफा मशीद यांना भेट दिली.

सांकवाळ येथील पूर्वीच्या श्री विजयादुर्गा मंदिराच्या भूमीची पहाणी करण्यासाठी गेलेले डावीकडून श्री. सत्यविजय नाईक, अधिवक्ता विष्णु शंकर जैन, सांकवाळ येथील स्थानिक श्री. संचित नाईक, अधिवक्ता मोहन यादव आणि प्रा. सुभाष वेलिंगकर

चर्च संस्था शासकीय अधिकार्‍यांवर दबाव आणून गेल्या काही वर्षांपासून ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ हे वारसा स्थळ कह्यात घेण्यासाठी विविध गैरकृत्ये करत आहे.

ख्रिस्त्यांनी अनधिकृतरित्या उभारलेला क्रॉस आणि डाव्याबाजूला पुरातन श्री विजयदुर्गादेवी मंदिराचे प्रवेशद्वार दिसत आहे.

या पार्श्‍वभूमीवर भेट दिलेल्या मान्यवरांनी या  परिसराचे निरीक्षण केले, तसेच फोंडा येथील साफा मशीद परिसरातील तळे आणि वडाचे झाड यांचीही मान्यवरांनी पहाणी केली.


हे पण वाचा –

♦ सांकवाळ तीर्थक्षेत्रावरील पुरातन श्री विजयादुर्गा मंदिराच्या ठिकाणी वारसास्थळी ख्रिस्त्यांकडून पुन्हा फेस्ताच्या आयोजनासाठी अनधिकृतपणे मंडपाची उभारणी
https://sanatanprabhat.org/marathi/537897.html

♦ शंखवाळी तीर्थक्षेत्रावरील पुरातन श्री विजयादुर्गा मंदिराच्या ठिकाणी पूजा-अर्चा आणि नामस्मरणाचा कार्यक्रम यांना स्थानिक ख्रिस्त्यांचा विरोध !
https://sanatanprabhat.org/marathi/436875.html