विधानसभेच्या उपाध्यक्षांकडून शिवसेनेच्या १६ बंडखोर आमदारांना नोटीस

विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शिवसेनेच्या १६ बंडखोर आमदारांना नोटीस पाठवली आहे. यावर त्यांना उत्तर देण्यासाठी ४८ घंट्यांची समयमर्यादा देण्यात आली असून उत्तर न दिल्यास आमदारांवर कारवाई केली जाऊ शकते.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे उल्हासनगर येथील कार्यालय फोडले  

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे येथील कँप २ भागातील मध्यवर्ती कार्यालय २५ जून या दिवशी दुपारी फोडण्यात आले.

राजकीय अस्थिरतेच्या काळात ५ दिवसांत सहस्रो कोटी रुपयांचे अध्यादेश !

महाराष्ट्रात राजकीय अस्थिरतेच्या काळात केवळ ५ दिवसांत सहस्रोे कोटी रुपयांचे अध्यादेश (सरकारी आदेश) निघाले आहेत. या ५ दिवसांत २८० अध्यादेश निघाले आहेत.

महिलांच्या मानवाधिकारांना आणि लैंगिक समानतेला धक्का ! – संयुक्त राष्ट्रे

संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार प्रमुखांनी गर्भपाताचा घटनात्मक अधिकार रहित करण्याचा अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा महिलांच्या मानवी अधिकारांना आणि लैंगिक समानतेला ‘मोठा धक्का’ असल्याचे म्हटले आहे.

अमेरिकेत महिलांच्या गर्भपाताचा अधिकार रहित !

मिसिसिपी राज्याने महिलेने गरोदर राहिल्यावर १५ आठवड्यांनंतर घातलेल्या गर्भपातावरील बंदीला आव्हान देण्यात आले होते. न्यायालयाने मिसिसिपी राज्याच्या बाजूने निकाल देऊन महिलांचा गर्भपाताचा घटनात्मक अधिकार संपुष्टात आणला.

गौहत्ती येथे बंडखोर आमदारांवर दिवसाला लाखो रुपयांचा व्यय !

‘रॅडिसन ब्लू’ उपाहारगृहात रहाणार्‍या आमदारांचा खाण्यावर प्रतिदिन ८ लाख रुपयांचा व्यय होतो, तर दुसरीकडे आसाममधील लोकांना पूर साहाय्य निधीच्या नावाखाली केवळ २ वाट्या तांदूळ आणि १ वाटी डाळ वाटली जात आहे.

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा ! – खासदार नवनीत राणा

सत्ता दूर जातांना पाहून सत्ताधारी पक्षाच्या गुंडांनी राज्यात धुमाकूळ घातला आहे. सत्तेचा दुरुपयोग वाढला आहे. राज्यातील जनतेच्या सुरक्षेसाठी आणि एकनाथ शिंदे यांच्यासमवेत गेलेल्या खर्‍या शिवसैनिकांच्या कुटुंबियांच्या सुरक्षिततेसाठी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा.

मुंबईत १० जुलैपर्यंत जमावबंदीचे आदेश

मुंबईतील सर्व राजकीय पक्षांची कार्यालये, तसेच मंत्री, खासदार, आमदार आणि महत्त्वाचे नगरसेवक यांची कार्यालये, निवासस्थाने-शाखा या ठिकाणी बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

केरळ पोलिसांच्या वाहनांवर इस्लामी चिन्हे असलेले ‘स्टिकर्स’ !

साम्यवादी केरळच्या राज्यात पोलीस दलाचे इस्लामीकरण झाल्यास आश्‍चर्य ते काय ?

शिवसेना म्हणजे निखारा असून त्यावर पाय ठेवला, तर जाळून टाकू ! – मुख्यमंत्री

‘बंडखोरांना आधी त्यांचा निर्णय घेऊ द्या. माझ्यावर शिवसैनिकांचे अधिक प्रेम आहे’, असेही ते या वेळी म्हणाले. या वेळी उपस्थितांनी ‘गद्दारांना परत घेऊ नका’, अशी मागणी उद्धव ठाकरे यांच्याकडे केल्यावर ते म्हणाले, ‘‘त्यांना परत घेणारच नाही.’’