NIA Raid : देशात २२ ठिकाणी एन्.आय.ए.च्या धाडी

  • अनेक धर्मांध कह्यात !

  • देशविघातक कृत्यांत हात असल्याचा संशय !

नवी देहली – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने  (नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी – एन्.आय.ए.ने) जम्मू-काश्मीर, उत्तरप्रदेश, आसाम, देहली आणि महाराष्ट्र येथे एकाच वेळी २२ ठिकाणी धाडी घातल्या. आतंकवादी आक्रमणाच्या कटाच्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली. यामध्ये अनेकांना कह्यात घेऊन त्यांची चौकशी केली जात आहे. अटक करण्यात आलेल्या लोकांचे जैश-ए-महंमद या आतंकवादी संघटनेशी संबंध असल्याची भीती एन्.आय.ए.ने व्यक्त केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये ४ जण महाराष्ट्रातील आहेत.

१. एन्.आय.ए. आणि महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथक यांनी महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि मालेगाव येथे धाडी घातल्या. मालेगाव येथील होमिओपॅथी चिकित्सालयातून ३ जणांना कह्यात घेतले, तर जालना येथूनही एकाला कह्यात घेण्यात आले. छत्रपती संभाजीनगरमधील किराडपुड्याजवळील आझाद चौक भागातून ३ जणांना कह्यात घेण्यात आले. आतंकवादी कारवायांमध्ये त्यांचा सहभाग असल्याच्या कारणावरून त्यांची चौकशी करण्यात येत आहे. तरुणांना कह्यात घेतलेल्या तीनही ठिकाणी पंचनामा चालू आहे. या आधीही महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि मालेगाव येथे एन्.आय.ए.ने धाडी घातल्या होत्या.

२. जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला येथे इक्बाल भट याच्या घरावर धाड घालण्यात आली. त्याच्यावर आतंकवादाला अर्थसाहाय्य केल्याचा आरोप आहे. याखेरीज काश्मीरमध्ये अन्यत्रही धाडी घालण्यात आल्या.

संपादकीय भूमिका

देशात राहून आतंकवादी संघटनांशी संबंध जोडून देशविघातक कार्यात साहाय्य करणार्‍या धर्मांधांना कठोर शिक्षा देणे आवश्यक !