भारत सरकारने क्षमा मागण्याविषयीचे अधिकृत पत्र कतार सरकारने मागे घ्यावे, अन्यथा आंदोलन करू !

अशी मागणी का करावी लागते ? भारत सरकारच कतारला पत्र मागे घेण्याविषयी का खडसावत नाही ?

अयोध्येतील श्रीराममंदिर ट्रस्टला देण्यात आलेले २ सहस्र धनादेश वटलेच नाहीत !

मंदिरासाठी अर्पण देतांनाही फसवणूक करणारे जन्महिंदू जनतेला किती फसवत असतील ?

झारखंडमध्ये १२ अल्पवयीन मुलांचे अवैध धर्मांतर करणार्‍या चर्चला जिल्हा प्रशासनाकडून नोटीस !

झारखंड राज्यात हिंदुद्वेषी आणि ख्रिस्तीप्रेमी झारखंड मुक्ती मोर्च्याचे राज्य आहे. त्यामुळे तेथे अल्पवयीन मुलांचे धर्मांतर केले असल्यास त्यांच्यावर कारवाई होईल, अशी अपेक्षा नाही. राज्यातील हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी परिणामकारक हिंदूसंघटन आवश्यक !

१ जुलैपासून ‘सिंगल यूज प्लास्टिक’च्या वस्तू वापरल्यास कारवाई होणार !

जनहिताचे नियम करणे एकांगी असून त्यांची कठोर कार्यवाही आणि कायद्याचे प्रामाणिकपणे पालन करणारी जनता निर्माण होणे आवश्यक आहे. असे आतापर्यंत होऊ न शकणे, हे लोकशाहीचे अपयश नव्हे का ?

‘फबिंग’ या मनोविकृतीला भाग्यनगर येथील ५० टक्के विद्यार्थी पडले बळी !

‘फबिंग’ म्हणजे तुमच्यासमवेत लोक असतांना त्यांच्याकडे दुर्लक्ष करून स्वत:च्या भ्रमणभाषमध्येच मग्न रहाण्याची मनोविकृती !

अमेरिका आणि नेदरलँड या देशांतील धर्मप्रेमींकडून हिंदु राष्ट्र अधिवेशनाला समर्थन !

अमेरिका आणि नेदरलँड या देशांतील धर्मप्रेमी हिंदूंनी ‘I support Hindu Rashtra Adhiveshan’, अशा प्रकारचे फलक हातात घेऊन हिंदु राष्ट्र अधिवेशनाला समर्थन दिले आहे.

VIDEO : स्वतः हिंदु धर्माचे आचरण केल्यासच हिंदूंना जागृत करणे शक्य ! – दयाल हरजानी, व्यावसायिक, हाँगकाँग

आपल्याला मूलत: आंतरिक प्रवास करून, म्हणजेच साधना करून धर्मकार्यासाठी सिद्ध व्हायला हवे. स्वतः हिंदु धर्माचे आचरण केल्यासच हिंदूंना जागृत करणे शक्य आहे, असे प्रतिपादन हाँगकाँग येथील व्यवसायिक श्री. दयाल हरजानी यांनी केले.

उत्तरप्रदेशच्या जौनपूर जिल्ह्यात हिंसक निदर्शने : दुचाकी, बस आणि जीप जाळल्या

केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेला विरोध

सरगुजा (छत्तीसगड) येथे शिवमंदिरात तोडफोड

येथील शांतिपारा भागातील शिवमंदिरातील भगवान शिव आणि नंदी यांच्या मूर्तींची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली. यामुळे संतप्त हिंदूंनी आणि त्यांच्या संघटनांनी येथे राष्ट्रीय महामार्ग बंद केले.

केंद्रीय सशस्त्र दल आणि आसाम रायफल्स यांमध्ये अग्नीवीरांसाठी १० टक्के आरक्षण

केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि आसाम रायफल्स यांमध्ये भरतीसाठी अग्नीपथ योजनातील सैनिक ‘अग्नीवीर’ यांना १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय गृह मंत्रालयाने घेतला. या दलांमधील भरतीसाठी वयोमर्यादेत ३ वर्षांची सूट देण्यात आली होती.