पाकप्रेमी अमेरिकी खासदार ओमर यांनी मांडलेला भारतविरोधी प्रस्ताव फेटाळावा ! – अमेरिकेतील ‘हिंदुपॅक्ट’ संघटनेची मागणी

अमेरिकेमध्ये हिंदुविरोधी कारवायांना तेथील हिंदुत्वनिष्ठ संघटना तात्काळ वैध मार्गाने विरोध करतात. भारतात हिंदु धर्मावर आघात होत असतांना काहीही न करणार्‍या जन्महिंदूंना यातून बरेच काही शिकण्यासारखे आहे !

शिंदे गटातील शिवसेना आमदारांना ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा

एकनाथ शिंदे गटात सहभागी झालेल्या आणि सध्या गौहत्ती येथे असलेल्या शिवसेनेच्या आमदारांच्या महाराष्ट्रातील घरांवर येथील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून आक्रमणे होण्याचे प्रमाण वाढल्याने या आमदारांनी केंद्र सरकारकडे सुरक्षा मागितली होती.

१६ बंडखोर आमदारांचे निलंबन होणार ! – खासदार अरविंद सावंत

मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीविषयी कायदेशीर सल्ला घेतला असून लवकरच १६ बंडखोर आमदारांचे निलंबन होणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

इम्रान खान यांची हेरगिरी करण्याचा प्रयत्न करणार्‍याला रंगेहाथ अटक

पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या झोपेच्या खोलीमध्ये गोपनीय कॅमेरा बसवतांना एका कर्मचार्‍याला रंगेहाथ अटक करण्यात आली. इम्रान खान यांची हेरगिरी करण्यासाठी हा कॅमेरा बसवण्यात येत होता.

देशात गेल्या २४ घंट्यांत कोरोनाचे ११ सहस्र ५७८ नवे रुग्ण

देशात गेल्या २४ घंट्यांत कोरोनाचे ११ सहस्र ५७८ नवे रुग्ण आढळले आहेत, तर २५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या ५ दिवसांत ७० सहस्र २६५ नवीन रुग्ण आढळले आहेत.

हिंदु देवस्थान इनामी भूमी अपहार प्रकरणात जाणीवपूर्वक प्रशासकीय विलंब !

अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वत:हून का कारवाई करत नाही ? तसेच हिंदु देवस्थानांच्या इनामी भूमी अपहार प्रकरणी कारवाईस विलंब का केला जातो ? हे हिंदूंना कळले पाहिजे !

विजेची बचत करण्यासाठी रात्री ९ नंतर पथदिवे बंद करण्याचा पाक सरकारचा आदेश

पाक आर्थिक दिवाळखोरीकडे वेगाने जात आहे. हे टाळण्यासाठी पाकचे सरकार आटापिटा करत आहे. यापूर्वी सरकारने लोकांना त्यांच्या अतिरिक्त खर्चात कपात करण्याची सूचना दिली होत्या.

पाटलीपुत्र (बिहार) येथे औषध निरीक्षकाच्या घरातून ४ कोटी रुपयांची बेहिशोबी रोकड जप्त

एका औषध निरीक्षकाकडे इतकी रोकड सापडते, तर राजकारण्यांकडे किती रोकड सापडेल ?

दक्षता विभागाने माझ्या घरावर धाड टाकतांना माझ्या मुलाची हत्या केली !

पंजाबचे वरिष्ठ भारतीय प्रशासकीय अधिकारी (आय.ए.एस्.) संजय पोपली यांनी त्यांचा मुलगा कार्तिक यांची दक्षता विभागाने हत्या केल्याचा आरोप केला. दक्षता विभागवाले माझीही हत्या करतील, असा दावाही त्यांनी केला.

मोरोक्कोहून स्पेनमध्ये घुसखोरी करतांना झालेल्या चेंगराचेंगरीत १८ जणांचा मृत्यू

मानवाधिकार संघटनांकडून चौकशीची मागणी