अलाहाबाद उच्च न्यायालयाने महंमद जुबैर यांच्यावरील गुन्हा रहित करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली

जुबैर यांच्या विरोधात धार्मिक भावना दुखावणे आणि ‘आयटी ऍक्ट’चे कलम ६७ च्या अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यावर जुबैर यांनी उच्च न्यायालयात गुन्हा रहित करण्याची मागणी करणारी याचिका प्रविष्ट केली होती.

देहली उच्च न्यायालयाने भाजपच्या खासदारांविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची माकपच्या वृंदा करात यांची याचिका फेटाळली

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि भाजपचे खासदार प्रवेश साहिब सिंह वर्मा यांनी वर्ष २०२० मध्ये केलेल्या कथित चिथावणीखोर विधानांच्या प्रकरणी माकपच्या हिंदुद्वेष्ट्या नेत्या वृंदा करात यांनी गुन्हा नोंवण्याची मागणी केली होती.

राहुल गांधी यांची ‘ईडी’कडून दोन टप्प्यांत चौकशी

‘नॅशनल हेराल्ड’ नियतकालिकातील आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची अंमलबजावणी संचालनालयाकडून (‘ईडी’कडून) चौकशी करण्यात आली.

उत्तरप्रदेशात आतापर्यंत ३२५ हून अधिक दंगलखोर मुसलमान गजाआड

शुक्रवारी झालेल्या नमाजानंतर किमान १४ राज्यांमध्ये मुसलमानांनी हैदोस घातला. तरी केवळ उत्तरप्रदेश शासनानेच दंगलखोरांच्या मुसक्या आवळल्या. अन्य राज्य सरकारे मात्र अपेक्षित कारवाई करतांना दिसत नाहीत !

VIDEO : श्री सिद्धीविनायक मंदिरांचा पैसा वापरणारे राजकीय नेते आणि संस्थाचालक यांना पैसे परत करण्याविषयी खडसवा ! – डॉ. अमित थडाणी, संचालक, निरामय रुग्णालय, मुंबई.

मंदिराचा पैसा हा मंदिराचा विकास, पूजा-अर्चा, भूमी आणि मालमत्ता खरेदी करण्यासाठी व्यय करायला हवा. प्रत्यक्षात तो होत नाही.

VIDEO : ‘… तर भारतीय संस्कृतीचे उत्तराधिकारी कोण ?’, याचा हिंदूंनी विचार करावा ! – एम्. नागेश्वर राव, माजी प्रभारी महासंचालक, सीबीआय

दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात ‘मंदिरांच्या सरकारीकरणाला विरोध का ?’ या विषयावर विचारमंथन !

‘नन’वर बलात्कार केल्याचा आरोप असणार्‍या माजी बिशप फ्रँको मुलक्कल याला ‘पाद्री’ म्हणून पुन्हा काम करण्यास पोप यांची अनुमती

केरळमधील सत्र न्यायालयाने निर्दोष ठरवल्याने अनुमती

ब्रिटनमध्ये प्रेषित महंमद यांच्या मुलीवरील चित्रपटाला विरोध करणार्‍या इमामाची सल्लागार पदावरून हकालपट्टी

मुसलमान कितीही उच्चशिक्षित किंवा उच्चपदस्थ असले, तरी त्यांच्यासाठी त्यांचा धर्म प्रथम असतो, हेच यातून दिसून येते !

भाजपचे खासदार गौतम गंभीर यांचा नूपुर शर्मा यांना पाठिंबा

गंभीर यांनी ट्वीट करत म्हटले की, क्षमा मागितल्यानंतरही एका महिलेविषयी देशभर द्वेषपूर्ण वक्तव्ये बोलली जात आहे. तिला आणि तिच्या कुटुंबाला जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. यावरून चालू असलल्या दंगली चिंताजनक आहेत.

भारताकडून पराजित झाल्यानंतर अफगाण खेळाडूंकडून भारतीय खेळाडूंना मारहाण

भारतात येऊन भारतीय खेळाडूंना मारहाण करण्याचे धाडस दाखवणार्‍या या खेळाडूंवर गुन्हा नोंद करून त्यांना भारताच्या कारागृहात डांबले पाहिजे !