६ ऑक्टोबरला १० घंट्यांचा ‘मेगा ब्लॉक’

मुंबई – ठाणे ते कल्याण आणि पनवेल ते वाशी यादरम्यान मध्य रेल्वेने ६ ऑक्टोबर या दिवशी ‘मेगा ब्लॉक’ घोषित केला आहे. या वेळेत लोकलगाड्या धावत नाहीत. ‘ब्लॉक’च्या कालावधीत सिग्नल आणि रुळांची देखभाल-दुरुस्तीची कामे करण्यात येतात. पश्चिम रेल्वेवर सहाव्या मार्गिकेच्या जोड कामांसाठी गोरेगाव ते कांदिवली या दरम्यान १० घंट्यांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. सहाव्या मार्गिकेतील कामांसाठी हा शेवटचा ‘ब्लॉक’ असणार आहे.