शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांचे आमदारांसह बंड !

शिवसेनेत किंमत दिली जात नसल्याच्या कारणावरून अप्रसन्न असलेले शिवसेनेचे नेते आणि राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी ३० हून अधिक आमदारांसह शिवसेनेच्या विरोधात बंडाचे निशाण फडकावले. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाल्याची चर्चा आहे.

सुधारणा अप्रिय वाटल्या, तरी त्याचे दूरगामी परिणाम चांगले ! – पंतप्रधान

पंतप्रधान म्हणाले, ‘कोणतेही निर्णय अथवा सुधारणा तात्कालिक अप्रिय वाटल्या, तरी काळानुसार त्यांचे चांगले आणि दूरगामी परिणाम देश अनुभवत आहे.’

फतेहपूर (उत्तरप्रदेश) येथे बेरोजगार हिंदु तरुणांना इस्लाम स्वीकारण्यास केले जात आहे बाध्य !

भाजपशासित उत्तरप्रदेशात धर्मांतरबंदी कायदा असतांनाही असे प्रकार घडणे हिंदूंना अपेक्षित नाही ! सरकारने आता तरी धर्मांतरबंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही करून दोषींवर कठोर कारवाई करावी !

संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान !

संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त राज्यातील विविध ठिकाणांहून किमान ४ लाखांहून अधिक वारकरी आळंदीत जमले होते. त्यामुळे इंद्रायणी काठ वारकर्‍यांच्या उपस्थितीने गजबजून गेला होता.

अग्नीपथ योजना देशासाठी आवश्यक ! – अजित डोवाल, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार

डोवाल म्हणाले की, अग्नीवीर (अग्नीपथ योजनेच्या अंतर्गत सहभागी झालेल्यांना ‘अग्नीवीर’ म्हटले जाणार) परिवर्तनाचे वाहक बनतील. भारत सैन्य सामग्री निर्मिती क्षेत्रात बरीच प्रगती करत आहे.

मालदीवमध्ये मुसलमानांनी योग दिनाच्या कार्यक्रमात केली तोडफोड !

इस्लामबहुल मालदीवमधील सरकार भारत शासनाच्या बाजूचे असल्याने मुसलमानांनी जाणीवपूर्वक योगदिनाला विरोध करण्याचा प्रयत्न केल्याचे लक्षात येते !

बलात्काराच्या वाढत्या घटनांमुळे पाकिस्तानातील पंजाब प्रांतात आणीबाणी !

पाकिस्तान इस्लामी देश असतांना तेथे शरियत कायद्यानुसार बलात्कार्‍यांना कमरेपर्यंत खड्ड्यात गाडून त्यांच्यावर दगड मारून त्यांना ठार मारण्याची शिक्षा का दिली जात नाहीत ?, असा प्रश्‍न अनेकांना पडू शकतो !

पाकिस्तानमध्ये अननुभवी वैद्यकीय कर्मचार्‍यांनी गर्भवती हिंदु महिलेचा जीव वाचण्याच्या प्रयत्नात अर्भकाचे डोके कापून ते गर्भातच सोडले !

पाकच्या थारपारकर जिल्ह्यातील एका गावातील भील समाजातील एका गर्भवती हिंदु महिलेवर ग्रामीण आरोग्य केंद्रात उपचार करतांना डॉक्टरांनी नवजात अर्भकाचे डोके कापून ते गर्भातच सोडून दिल्याची घटना समोर आली आहे.

बांगलादेशातील शरणार्थी रोहिंग्या मुसलमान अमली पदार्थ आणि महिला यांची तस्करी करत आहेत ! – बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना

बांगलादेशातील मुसलमान भारतात घुसखोरी करून अशा प्रकारच्या गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभागी झाले आहेत, त्याविषयी शेख हसीना का बोलत नाहीत ?

भारतीय नागरिकाला संयुक्त राष्ट्रांकडून आतंकवादी घोषित करण्याचा पाकचा प्रयत्न भारताने उधळला !  

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारतीय नागरिक गोविंद पटनायक यांना संयुक्त राष्ट्रांकडून आतंकवादी ठरवण्याचा प्रयत्न पाकिस्तान करता होता. हा प्रयत्न भारताने अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन आणि अल्बानिया यांच्या साहाय्याने उधळून लावला.