भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी कृतीशील व्हा ! – प.पू. उल्हासगिरी महाराज, मठाधिपती, प.पू. गगनगिरी महाराज आश्रम, कोंडीवळे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी

धर्मांतर, लव्ह जिहाद, हिंदु देवतांचे विडंबन, देवतांच्या मूर्तींची तोडफोड, मंदिरांवरील आक्रमणे, हिंदूंच्या उत्सवांवर होणारी दगडफेक, दंगली, ग्रंथांची अवहेलना, पाश्चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण अशी असंख्य आव्हाने पहाता हिंदु राष्ट्र स्थापनेची आवश्यकता लक्षात येते.

राजभवन हे महाराष्ट्रातील जनतेसाठी नवी ऊर्जा देणारे लोकभवन ! – पंतप्रधान मोदी

राजभवनामध्ये क्रांतीगाथा दालनाच्या उद्घाटनाच्या प्रसंगी ते बोलत होते. या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेही उपस्थित होते.

कत्तलीसाठी नेणाऱ्या ३६ गोवंशियांचे पोलिसांनी वाचवले प्राण !

जिल्ह्यातील पारडी पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार ट्रकच्या पडताळणीत कत्तलीसाठी नेण्यात येणारे ३६ गोवंशीय सापडले. ट्रकसमवेत २४ लाख ४० सहस्र रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

शिकाऊ आधुनिक वैद्यांनी चुकीचे इंजेक्शन दिल्याने महिलेला डोळा गमवावा लागला !

इंजेक्शन देण्यात हलगर्जीपणा करणाऱ्या आधुनिक वैद्यांना बडतर्फच करायला हवे !

ढोंगी हिंदुत्वाकडून असली हिंदुत्वाकडे प्रवास चालू होवो ! – मनसे

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे १५ जून या दिवशी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. याविषयी मनसेने त्यांच्यावर ‘ढोंगी हिंदुत्वाकडून असली हिंदुत्वाकडे प्रवास चालू होवो’, अशी टीका केली आहे.

भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला !

भाजपाचे आमदार जयकुमार गोरे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. गोरे यांच्या विरोधात भूमीची खोटी कागदपत्रे बनवून फसवल्याप्रकरणी गुन्हा नोंद आहे.

विद्यार्थ्याला कारागृहात डांबणाऱ्या पोलिसांना मुंबई उच्च न्यायालयाने फटकारले !

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह ट्वीट केल्याच्या गुन्ह्यात २१ वर्षाच्या विद्यार्थ्याला एक मास कारागृहात डांबल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने पोलिसांना फटकारले.

पुण्यातील ३ सहस्र ५०० गुंडांकडून पिस्तुले, काडतुसे, शस्त्रसाठा जप्त ! – गुन्हे शाखेची विशेष मोहीम

शहरातील गुंडांची झाडाझडती घेण्यासाठी गुन्हे शाखा आणि पोलीस ठाण्यांमधील पथकांनी विशेष मोहीम राबवली. या कारवाईत पोलिसांनी शहरातील ३ सहस्र ५०० गुंडांकडून पिस्तुले, काडतुसे, तलवारी, कोयते आदी साहित्य शासनाधिन केले.

कोरोनामुळे राज्यातील २५ सहस्र विद्यार्थी शिक्षणापासून वंचित ! – प्रा. वर्षा गायकवाड, शिक्षणमंत्री

कोरोनामुळे मागील दोन वर्षांत राज्यातील २५ सहस्र विद्यार्थी शालेय शिक्षणापासून वंचित राहिले आहेत. त्यांना शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, अशी माहिती शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली.