छत्रपती संभाजीनगर – नवरात्रोत्सव ३ ऑक्टोबरपासून चालू झाला आहे. या उत्सवाच्या वेळी ‘दांडिया’ या सांस्कृतिक उपक्रमात हिंदु धर्म मानणार्यांनाच आणि कपाळावर टिळा लावून येणार्यांच प्रवेश द्यावा, असे आवाहन भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष श्री. शिरीष बोराळकर यांच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
या प्रसिद्धीपत्रकात त्यांनी नमूद केले आहे की, हिंदु माता-भगिनी यांची छेडछाड, लव्ह जिहाद, नशेखोरी असे अनेक प्रकार वाढलेले आहेत. हिंदु मुलींना जाळ्यात ओढण्याचे प्रकार घडत आहेत. या घटनांवर आळा बसवण्यासाठी भाजपच्या वतीने प्रत्येक नवरात्रोत्सव मंडळाला आवाहन करण्यात आले आहे.
आधारकार्ड पडताळण्याची विहिंपची मागणी !
विश्व हिंदु परिषदेनेही राज्यातील सर्व प्रमुख शहरांमध्ये गरबा आयोजन करणार्या मंडळांना पत्र पाठवून केवळ हिंदूंनाच प्रवेश देण्याचे आवाहन केले आहे. ‘प्रवेश देतांना त्यांचे आधारकार्ड पडताळा, कपाळाला टिळा लावूनच आत पाठवा’, असे आवाहन केले आहे.