अयोध्येतील दाक्षिणात्य शैलीतील पहिल्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेला योगी आदित्यनाथ यांची उपस्थिती

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ येथे द्रविडी शैलीत बांधण्यात आलेल्या रामलला सदन मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेला उपस्थित होते.

अयोध्येतील श्रीराममंदिर परिसरात दारू विकण्यावर बंदी !

उत्तरप्रदेश सरकारचा अभिनंदनीय निर्णय ! केवळ श्रीराममंदिरच नव्हे, तर प्रत्येक मंदिराच्या परिसराजवळ दारूविक्रीवर बंदी घातली पाहिजे. संपूर्ण देशातच असा नियम बनवला पाहिजे !

विवेक अग्निहोत्री यांचा ऑक्सफर्ड विश्‍वविद्यालयातील कार्यक्रम अचानक रहित

ब्रिटनमधील विश्‍वविद्यालये कशी हिंदूविरोधी आहेत, हेच या घटनेतून दिसून येते. याचा निषेध भारत सरकारनेही करणे आवश्यक !

 प्रसिद्ध गायक के.के. यांचे हृदयविकाराने निधन

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नथ (के.के.) यांचे येथे हृदयविकाराने निधन झाले. ते ५३ वर्षांचे होते.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते श्रीराममंदिराच्या गर्भगृहाचा शिलान्यास

श्रीरामजन्मभूमीवर बांधण्यात येणार्‍या भव्य श्रीराममंदिराच्या गाभार्‍याचे भूमीपूजन उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते करण्यात आले.

ज्ञानवापी मशिदीतील व्हिडिओ पाहून तेथे शिवलिंग असल्याचे वाटते ! – अभिनेते अक्षय कुमार

श्री काशी विश्‍वनाथ मंदिर आणि ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाचे काम काही दिवसांपूर्वी पूर्ण झाले. यांमधील काही व्हिडिओ उघड (लीक) झाल्याचा आरोप हिंदु पक्षकारांनी केला आहे. या व्हिडिओमध्ये शिवलिंग, त्रिशूळ आदी चिन्हे दिसत आहेत.

अलीगड (उत्तरप्रदेश) येथील महाविद्यालयाच्या परिसरात नमाजपठण करणार्‍या प्राध्यापकाच्या विरोधात गुन्हा नोंद

नमाजपठण करत असल्याचा त्यांचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्यानंतर भारतीय जनता युवा मोर्चाकडून यास विरोध करण्यात आला होता.

आसाममधील ‘सरकारी’ मदरशांचे सामान्य शाळांमध्ये रूपांतर करण्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका !

मुसलमान याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे की, आसाम सरकारचा मदरशांच्या संदर्भातील निर्णय हा राज्यघटनेतील २५, २६, २८ आणि ३० या कलमांचे उल्लंघन करतो.

चितोडगड (राजस्थान) येथे रा.स्व. संघाच्या संयोजकाची हत्या

काँग्रेसच्या राज्यात हिंदू आणि हिंदूंचे नेते असुरक्षितच असतात, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले ! अशा काँग्रेसला राजकीयदृष्ट्या संपवण्यासाठी हिंदूंना प्रयत्न करणे आवश्यक !

पाकच्या गृहमंत्र्यांना अमली पदार्थांच्या प्रकरणी समन्स

ज्या देशाचा गृहमंत्रीच गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभागी असेल, तो देशातील कायदा आणि सुव्यवस्था काय राखणार ?