श्रीलंकेनंतर आता नेपाळवर आर्थिक संकटाचे सावट !

श्रीलंका सध्या आर्थिक संकटातून जात असून त्याच्यावरील गेल्या ७० वर्षांतील हे सर्वांत मोठे संकट असल्याचे म्हटले जात आहे. अशातच भारताचा दुसरा शेजारी देश असलेल्या नेपाळवरही असे संकट कोसळू शकते, अशी चिन्हे आहेत.

देहलीतील जहांगीरपुरी येथील अनधिकृत बांधकामांवर मोठी कारवाई

देशातील प्रत्येक अनधिकृत बांधकामांवर कारवाई झाली पाहिजे, यासाठी प्रशासन, पोलीस आणि शासनकर्ते सदैवच कृतीशील असले पाहिजेत, असेच जनतेला वाटते !

६ जणांना फाशीची, तर ७ जणांना जन्मठेपेची शिक्षा !

पाकिस्तानमधील न्यायालय हत्येच्या प्रकरणात अवघ्या ५ मासांत निकाल देत असेल, तर भारतातही हे होणे शक्य आहे. याकडे भारत सरकारने लक्ष दिले पाहिजे !

धार्मिक स्थळांवरील ध्वनीक्षेपकांचा आवाज आवारापुरता मर्यादित ठेवा !

उत्तरप्रदेश सरकारचे निर्देश
अनुमतीविना ध्वनीक्षेपकाचा वापर करण्यास बंदी

कोरोनाचा पुन्हा प्रभाव

उत्तरप्रदेशातील काही जिल्हे आणि देहली राज्यात मास्क अनिवार्य !
देहलीमध्ये मास्क न घातल्यास ५०० रुपये दंड

युनेस्कोच्या पुरातन वास्तूंच्या सूचीत भारतातील केवळ ४० नावे !

सहस्रो वर्षांचा इतिहास असणार्‍या भारतातील केवळ ४० वास्तूंची सूची प्रसिद्ध करणार्‍या युनेस्कोला पुरातन वास्तू ओळखता येतात का ? असाच प्रश्‍न उपस्थित होतो !

हिंदु धर्माची अद्वितीय शिकवण !

‘देव सर्वत्र आहे, प्रत्येकात आहे’, ही हिंदु धर्माची शिकवण असल्यामुळे हिंदूंना इतर पंथियांचा द्वेष करायला शिकवले जात नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले  

पुण्यातील दगडूशेठ गणपतीची मूर्ती आता सियाचीन सीमेवर विराजमान !

भारतीय सैन्यातील २२ मराठा बटालियनच्या सैनिकांनी सियाचीनमध्ये उभारलेल्या सर्वधर्मस्थळामध्ये पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.