उन्नाव (उत्तरप्रदेश) येथे मंदिरांजवळ अहिंदूंना दुकाने लावण्याची अनुमती देऊ नये ! – हिंदु जागरण मंचची मागणी

या मागणीला धार्मिक रंग देत बसण्यापेक्षा ‘अशी मागणी करण्याची वेळ हिंदूंवर का येते ?’, याचा विचार करणे आवश्यक !

घरावर भाजपचा ध्वज लावणार्‍या मुसलमान तरुणाला धर्मांधाकडून जिवे मारण्याची धमकी : गुन्हा नोंद !

भाजपचे समर्थन करणारे मुसलमान देशात असुरक्षित जीवन जगत आहेत, हेच यातून दिसून येते. एरव्ही ‘देशातील मुसलमान असुरक्षित आहेत’, अशी आरोळी ठोकणारे धर्मनिरपेक्षतावादी आता गप्प का ?

बुद्धीवादी केवळ हिंदूनांच उपदेशाचे डोस पाजतात ! – कर्नाटकचे गृहमंत्री

कर्नाटकचे गृहमंत्री अरगा ज्ञानेंद्र यांनी सांगितले की, धर्मनिरपेक्षतेवर हिंदूनांच उपदेशाचे डोस पाजणार्‍या बुद्धीवाद्यांनी राज्य घटनेचा आदर न करणार्‍यांना शिक्षित केले पाहिजे आणि हिजाबविषयी कर्नाटक उच्च न्यायालयाचा आदर केला पाहिजे.

गुढीपाडव्याच्या निमित्ताने सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून व्यापक प्रमाणात धर्मप्रसार !

गुढीपाडव्याच्या निमित्ताने सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात प्रवचन, फलकप्रसिद्धी, सामूहिक गुढी, सामाजिक माध्यम यांद्वारे व्यापक प्रमाणात धर्मप्रसार करण्यात येत आहे. या कार्यात धर्मप्रेमींचा कृतीशील सहभाग आहे.

स्वत:मधील शिवतत्त्व, दुर्गातत्त्व जागृत करून धर्मकार्य करण्यास सिद्ध व्हा ! – सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये, सनातन संस्था

आपण ज्या देशात जन्मलो त्या मातृभूमीचे ऋण आपल्याला फेडायचे असेल, तर पुरुषांची त्यांच्यातील शिवतत्त्व आणि महिलांनी त्यांच्यातील दुर्गातत्त्व जागृत करून धर्मकार्य करण्यास सिद्ध व्हावे, असे आवाहन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांनी केले. त्या साधना सत्संग जिज्ञासू शिबिरात बोलत होत्या.

दैनिक ‘सनातन प्रभात’मधून हिंदुत्वाविषयी अतिशय स्पष्ट विचार मांडले जातात ! – पू. भास्करगिरि महाराज, मठाधिपती, दत्त देवस्थान

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने दिनांक १२ आणि १३ मार्च या दिवशी नगर जिल्ह्यातील देवगड येथे नगर, संभाजीनगर, नांदेड, परभणी या जिल्ह्यांतील धर्मप्रेमींसाठी हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळा घेण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते.

#Gudhipadva : जाणून घ्या पंचांगातील गुढीपूजन करतांनाचा ‘देशकाल’ !

कोणताही धार्मिक विधी करतांना देशकाल कथनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पूजेचा संकल्प करण्याआधी देशकाल म्हटले जाते. यातून मनुष्याला एकूण अनंत काळाची व्याप्ती कळून येते. यातून त्याला स्वत:च्या सूक्ष्मत्वाची जाणीव झाल्याखेरीज रहात नाही.

#Gudhipadva : गुढीपाडव्याला कोणती प्रार्थना करावी ?

‘हे ईश्‍वरा, आज तुझ्याकडून येणारे शुभाशीर्वाद आणि ब्रह्मांडातून येणार्‍या सात्त्विक लहरी मला जास्तीतजास्त ग्रहण करता येऊ देत. या लहरी ग्रहण करण्याची माझी कुवत नाही. मी तुला संपूर्ण शरण आलो आहे. तूच मला या सात्त्विक लहरी ग्रहण करायला शिकव’, हीच तुझ्याचरणी प्रार्थना !

#Gudhipadva :जाणून घ्या गुढीपाडव्याचे नैसर्गिक महत्त्व !

सर्व ऋतूंत ‘कुसुमाकरी वसंत ऋतू ही माझी विभूती आहे’, असे भगवंतांनी श्रीमद्‍भगवद्‍गीतेत (१०:३५) म्हटले आहे.

#Gudhipadva : VIDEO – गुढीपाडव्याचे अद्वितीय महत्त्व

चैत्र शुद्ध प्रतिपदा ! या दिवसापासून पुन्हा देव, ऋषी, पितर, मनुष्य आणि भूत यांची पूजा करायला आरंभ करायचा, त्यांचे आशीर्वाद मिळवायचे आणि आपापली कर्तव्यकर्मे करायला आरंभ करायचा, हाच पाडवा साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश आहे.’